चंद्रपूर/प्रतिनिधी:
संपूर्ण महाराष्ट्रात अघामी काळात विधासभेच्या निवडणूका आहेत. त्या पार्श्वभूमीवर अपेक्षीत असा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी सादर केला. आजच्या अर्थसंकल्पात सर्व बाबींचा विचार करुन भरीव निधीची तरतूद करण्यात आली. या अर्थसंकल्पात जातीय समीकरणही लक्षात घेवून तरतूद करण्यात आली आहे. ओ.बी.सी. आणि धनगर समाजासाठी मोठी तरतूद करत या दोन समाजाला आकर्षीत करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगारांची थोडी निराषा झाली आहे. उद्योग व रोजगार वाढीसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा होती मात्र ती पूर्ण झाली नाही. मात्र या अर्थसंकल्पातील भरीव तरतुदी मुळे संजयगांधी, श्रावणबाळ, योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनात ४०० रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना आता ६०० रुपये वरून १००० रुपये मिळणार आहे. हि वाढ या योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा देणारी आहे. एकंदरीत आघामी निवडणूका लक्षात घेता अपेक्षीत असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.