भिवापुरात बोरिंग मिळेना
नागरिकांनी मानले महापौरांचे आभार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
संपूर्ण महाराष्ट्रात पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या चंद्रपूर शहरात हि अशी स्थिती निर्माण होऊ नये या कडे गंभीरतेने लक्ष देऊन महापौर सौ. अंजली घोटेकर नागरिकांच्या तक्रारींवर ज्या ठिकाणी पाणी समस्या आहे त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करत आहे. तसेच तात्काळ पाणी समस्या सोडविण्यात येत आहे.
अशीच तक्रारींवर समाधी वार्ड येथील सन्मित्र कॉन्व्हेंट मागे नागरिकांची पाण्याविषयी समस्या महापौर सौ अंजली घोटेकर यांनी जाणून घेतली व त्या ठिकाणी त्वरित बोरिंग लावण्यात आली. तसेच बोरिंग चे उदघाटन महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे हस्ते करण्यात आले. या बद्दल समाधी वार्ड, सन्मित्र कॉन्व्हेंट परिसरातील नागरिकांनी महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे आभार मानले.
चंद्रपूर शहर वासियांना पाण्याची कोणतीही समस्या होऊ नये सर्वांना पाणी सुरळीत मिळावे याकडे गंभीरतेने लक्ष्य देऊन मनपा मार्फत जागोजागी कृत्रिम पाण्याची टाकी लावण्यात आली असून अजून टाकी लावण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. अशी माहिती महापौर सौ अंजली घोटकर यांनी दिली.
या प्रसंगी समाधी वार्ड सन्मित्र कॉन्व्हेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.