ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेविका मॅडम नियमित हजर राहत नाही
शैक्षणिक कामे खोळंबले
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणारे तालुक्यात १८ कि.मी असलेल्या गाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून (जुना) जामसाळा ग्रामपंचायतीकडून गाव स्वच्छता होत नसल्याचा आरोप ग्राम वासियांकडून होत आहे .
मागील महिन्यात लेखी तक्रार श्री. हरिदास बालाजी नैताम यांनी ग्रामपंचायतला केली होती .
तसेच याची माहिती दिली. आणि परत दि.18/5/2019 संवर्ग विकास अधिकारी सिदेवाही यांना लेखी निवेदन सुद्धा दिले होते .परंतु आजतागायत स्वच्छतेचा विषय संपलेला नसून ग्रामपंचायतीकडुन सतत दुर्लक्ष होत आहे. नागरिकांचा आरोप असा आहे की मा. ग्रामसेविका मॅडम हे ग्रामपंचायत येथे दररोज (नेहमी) उपस्थित नसल्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे .
माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छतेवर जास्त लक्ष दिलेले आहे .परंतु काही अधिकारी यांच्या दुर्लक्ष कारभारामुळे स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरी पावसाळा लागायच्या अगोदर पुर्ण गाव स्वच्छ करण्यात यावा , जेणेकडुन कोणत्याही रोगराईस गावातला नागरीक बळी जानार नाही . जुना जामशाळा येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेविका मॅडम हजर राहत नाही.
याकडेही संवर्ग विकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे व सांगावे अशी मागनी स्थानिक लोकांकडून होत आहे. याबाबत संवर्ग विकास अधिकारी सिंदेवाही (बिडिओ) यांना विचारणा केली असता तेसुद्धा फोन उचलत नाही.