Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०४, २०१९

भिवापूर ग्रामीणचा वीज पुरवठा सुरळीत

नागपूर/प्रतिनिधी: 
वीजपुरवठा साठी इमेज परिणाम
सोमवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विस्कळीत झालेला भिवापूर परिसरातील वीज पुरवठा आज दुपारी सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भिवापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे २३ गावातील सुमारे चार हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

महावितरणच्या भिवापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दामोदर उरकुडे यांनी भिवापूर शहर शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता तुषार बारई यांना सोबत घेऊन अंधारात पडलेल्या वीज वाहिन्यांची तपासणी केली.वादळी वाऱ्यामुळे तारगाव , भागेबोरी, गोंडबोरी, झिलबोडी, मोखाला, किनाळा आदींसह एकूण २३ गावातील वीज पुरवठा बंद पडला होता. कनिष्ठ अभियंता तुषार बरे यांनी भिवापूर शहर शाखा कार्यालयातील जनमित्र यशवंत भक्ते, मारोती मडावी, श्रीमती सुमित्रा उसेंडी, श्याम वाघ, योगेश्वर पाटील, भास्कर देवतळे आणि हेमराज बिसेन यांना सोबत घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु केले. महावितरणच्या चमूने ११ गावातील वीज पुरवठा मध्य रात्रीच्या सुमारास सुरळीत केला. उर्वरित ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नव्हते. मात्र मंगळवारी सकाळीच या चमूने पुन्हा कामाला सुरुवात करून दुपारी ४ वाजे पर्यंत उर्वरित १२ गावातील वीज पुरवठा पूर्ववत केला.

सोमवरच्या वादळामुळे महावितरणच्या भिवापूर उपविभागात १३५ विजेचे खांब जमीनदोस्त झाले असून १२ विजेचे खांब वाकले आहेत. जमीनदोस्त झालेले बहुतांश खांब शेती पंपाला वीज पुरवठा करणारे आहेत. शेती पंपाला होणार वीज पुरवठा देखील लवकरच सुरळीत करण्यात येईल असे महावितरणकडून सांगण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.