नागपूर १९ महा मेट्रो नागपूर प्रकल्पातील स्टेशन आणि विविध उपकरणांचे तथा प्रवासी सुविधांची पाहणी करण्यासाठी'सीएमआरएस' टीम मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त श्री जनक कुमार गर्ग यांच्या नेतृत्वात आज बुधवार रोजी नागपूर पोहोचली. यात वरिष्ठ अधिकारी के एल पुर्थी आणि वरुण मौर्य सहभागी आहेत.
सुरवातीला सिव्हिल लाईन स्थित मेट्रो हाऊस येथे सीएमआरएस टिम प्रमुख श्री गर्ग यांनी महा मेट्रो'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध कार्यांची माहिती जाणून घेतली. उल्लेखनीय आहे की 'सीएमआरएस' टीम ने सीताबर्डी इंटरचनेंज ते खापरी स्टेशन पर्यंत ट्रॅक आणि इतर संबंधित कार्याचे परीक्षण करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आली आहे.
बैठकीत महा मेट्रो'चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेट्रो ट्रॅक, स्टेशन, रोलिंग स्टॉक ई. घटकांची माहिती दिली. यावेळी महा मेट्रो'चे संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री सुनील माथूर, संचालक (वित्त) श्री एस शिवमाथन, महा व्यवस्थापक (प्रशासन) श्री अनिल कोकाटे उपस्थित होते. यांनतर मेट्रो सुरक्षा आयुक्त तथा टीम ने सीताबर्डी स्थित इंटरचेन्ज स्टेशन'ची पाहणी केली. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि विविध उपकरणांचे बारकाईने निरीक्षण केले. तथा स्टेशन लागलेले स्मोक डिटक्षन सिस्टम,आपातकालिन प्रकाश व्यवस्था, अग्निशामक उपकरण, स्कॅनर, ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन, एस्केलेटर ई. उपकारांची देखील पाहणी अधिकाऱ्यांनी केली.
प्रवासी सुविधां संबंधित करण्यात आलेली व्यवस्थेप्रती 'सीएमआरएस' टीम ने समाधान व्यक्त केले. स्टेशन'वर उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रत्येक घटकांची सविस्तर माहिती 'सीएमआरएस'ला दिली. तसेच उद्या गुरवार २० जून रोजी सीएमआरएस टीम इंटरचेन्ज स्टेशन येथून ट्रॉली ने प्रवास करून एयरपोर्ट व खापरी स्टेशन'चे परीक्षण करेल. यानंतर टीम खापरी स्टेशन ते इंटरचेन्ज स्टेशन पर्यंत मेट्रो ट्रेन'ने प्रवास करून सर्व संबंधित उपकरणांचे निरीक्षण करेल.
सीएमआरएस चमू पाहणी दरम्यान गुरुवार सकाळी मेट्रो सेवा बंद*
दिनांक २०.०६.२०१९ (गुरुवार) रोजी सीएमआरएस चमू खापरी ते सिताबर्डी दरम्यान मेट्रो रेल प्रकल्पाची पाहणी करणार असल्यामुळे मेट्रो प्रवासी सेवा सकाळी ०८.०० ते ११.०० वाजेपर्यंत बंद राहील.तसेच दुपारी ३.३०,५.०० व सायंकाळी ६.३० वाजता पासून प्रवासी सेवा नागरीकांन करिता पूर्ववत होईल.यांची सर्वांनी नोंद घ्यावी.