Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

पहिले अखिल भारतीय श्री संत संताजी साहित्य संमेलन


  •  30 एप्रिल व 1 मे रोजी
  • अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अरूण इंगवले

पुणे - पहिले अखिल भारतीय श्री संत संताजी व संत साहित्य संमेलन दि. 30 एप्रिल व 1 मे रोजी कै. नलिनी वसंतराव बागुल नगरी, राजीव गांधी ई लर्निंग नॅशनल स्कुल, शिवदर्शन चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अरूण इंगवले, स्वागत अध्यक्ष उल्हास (आबा) बागुल, उद्घाटक म्हणून उपमहापौर शिरीष पन्हाळे व स्मरणिका प्रकाशन महिती संचालक व जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती तेली समाजाचे मोहन देशमाने यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

या संमेलनाचे उद्घाटन दि. 30 रोजी दुपारी 4 वा. होणार आहे. यावेळी प्रा. राजेंद्र कुंभार-कोल्हापूर, सुभाष घाटे-नागपूर, रामनाथ साहु-उत्तर प्रदश (झाँसी), फुला बागुल-ज्येष्ठ साहित्यिक आदी मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत. दि. 1 रोजी सकाळी 10 ते 1 वा. ‘श्री संत संताजी विचारधारा’ या विषयावर सत्रअध्यक्ष संत तुकाराम महाराज साहित्य अभ्यासक, औरंगाबाद-विजय गवळी यांच्यासह इतर मान्यवर मंडळी आपले विचार
मांडणार आहे. दुपारी 1 ते 2.30 वा. ‘स्त्री समतेसाठी संताचे कार्य व स्त्री संत’ या विषयावर सत्रअध्यक्ष विजयाताई मारोतकर-नागपूर यांच्यासह इतर मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत. तसेच दुपारी 3 ते 4 वा. ‘मानव कल्याणासाठी श्री संत संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्याचा खरा इतिहास अभ्यासण्याची आवश्यक्यता’ या विषयावर सत्रअध्यक्ष अनिल राऊत यांच्यासह इतर मान्यवर मंडळी आपले विचार मांडणार आहेत. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.