Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१९

30 एप्रिलचे आंदोलन तुर्तास स्थगीत

  • जिल्हाधिका-यांच्या विनंती नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या मागण्यांवर होणार चर्चा
  • जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत पाण्याबाबत बैठक


चंद्रपूर- पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.नियमीत पाणी पूरवठा करा या मागणी करिता किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातयंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलनाची शृंखला सुरु आहे. परिणामी काही भागात अनियमीत पाणी पूरवठा सुरु करण्यात आला आहे.मात्र आम्ही यावर संतृष्ट नसून पाणी पूरवठा नियमीत सुरु करा या मागणीवर किशोर जोरगेवार ठाम असून आज त्यांनी जिल्हाधिकारीकूणाल खेमणार यांची भेट घेतली यावेळी जोरगेवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देत जिल्हाधिका-यांनीउदया मंगळवारी मनपा आयुक्त यांच्या सोबत बैठक घेवून प्रश्न सोडवीण्याचे आश्वासण दिले व 3० एप्रिल चे आंदोलन मागे घेण्याचीविनंती केली त्यांच्या विनंतीला मान देत जोरगेवार यांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगीत केले आहे. मात्र पाणी पूरवठा सुरळीत नझाल्यास आंदोलनाची शृंखला आणखी तिव्र करु असा ईशारा जोरगेवार यांनी दिला आहे.

चंद्रपूरचे तापमाण ४७ अंशावर गेले असतांनाच महापालीकेच्या भोंगळ कारभारामूळे नारिकांची पाण्याअभावी लाई-लाई होतआहे. मागील अणेक महिण्यांपासून शहरातील पाणी पूरवठयाची व्यवस्था कोडमळली असून याचा मोठा त्रास नागरिकांना सहण करावालागत आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतांनाही आर्थीक लाभासाठी पाणी टंचाई निर्माण केल्या जात आहे. याविरोधात यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाची शृंखला सुरु केली असून पाणी नाही तर कर नाहीअशी भुमीका घेतली आहे

त्यामूळे शहराला पाणी पूरवठा करणा-या उज्वल कॅन्ट्रक्शन सह महानगर पालीका चांगलीच धास्तावली आहे.आंदोलनामूळे नागरिकांचा वाढतारोष लक्षात घेता काही भागात महानगर पालिकेच्या वतीने दोन दिवसाआड पाणी पूरवठा केल्या जात आहे. मात्र यावर आम्ही संतृष्ट नाही असा पवित्रा घेत मुबलक पाणी पूरवठा करा या मागणीवर यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार ठाम आहे व ३० एप्रिलला तिव्रआंदोलनाचा ईशाराही त्यांच्या वतीने देण्यात आला होता. दरम्यान आज किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेवूनत्यांना शहरातील पाण्यासंदर्भातील वस्तुस्थिती अवगत करून दिली यावेळी कुणाल खेमणार यांनी विषय समजून घेत उदया पाणी प्रश्नावर मनपाअधिकारी व उज्वल कॅन्ट्रक्शनची बैठक बोलावून प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत किशोर जोरगेवार यांनी सुचाविलेल्या पाण्याची टाकी भरल्या गेली की नाही हे दर्शवीणारे वॉटर लेवल इंडिकेटर प्रत्येक पाण्याच्या टाकीवर लावण्यात येणे, प्रत्येक घरी किती पुरवठा केल्या जातो याची नागरिकांना माहिती कार्ल्ण्यासाठी नळाला मीटर लावणे तसेच प्रत्येक वार्डात पाण्याबातची अचूक माहीती देण्यासाठी समीत्यास्थापण करणे या उपाययोजनांवर चर्चा करुन त्याची अमल बजावणी केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले आहे. तसेच यंग चांदाब्रिगेडचे ३० एप्रिलचे जन आंदोलन मागे घेण्याचीही जिल्हाधिका-यांनी जोरगेवार यांनी विनंती केली. या विनंतीला मान देत जोरगेवार यांनी 30एप्रिलला होणारे आंदोलन तुर्तास स्थगीत केले आहे.मात्र यानंतरही शहरातील पाणी पूरवठा सूरळीत न झाल्यास पून्हा आंदोलनाची शृंखला सुरुकरुन आंदोलन तिव्र करु असा ईशारा जोरगेवार यांनी दिला आहे.यावेळी दीपक दापके, नगरसेवक विशाल निंबाळकर, जितेंद्र चोरडिया, इरफान शेख, विलास सोमलवार, राहुल पाल, रुपेश चहारे, सचिन गहुकर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.