Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१९

नदीतील वाळुच्या अती उपसामुळे चितेगावात पाणी टंचाई

मागील छप्पन वर्षात प्रथमच आटल्या गावातील विहीरी

मूल/रमेश माहूरपवार 
पाणी आटलेली विहीर
अधिकाधिक पैसा कमविण्याच्या लालसेने ग्रासलेल्या माणसांकडुन नैसर्गीक संसाधनाची अक्षरश: लुट केली जात आहे. तालुक्यातील चितेगावात उदभवलेली पाणी टंचाई माणसांच्या याच क्रुतीचे दयोतक असुन गावाशेजारून वाहणा—या नदी—नाल्यांमधील वाळुचा वैदय/अवैदयरित्या मोठयाप्रमाणात उपसा होत असल्यानेच गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकरी करीत आहे.
तालूका महसुल विभागाच्या माहिती प्रमाणे मूल तालूक्यात 19 वाळुचे घाट आहेत. ही सर्वच वाळु घाट गावालगत असल्याने घाटांवरून केल्या जाणा—या वाळुच्या उपसा आणि वाहतुकीच्या गावक—यांवर परीणाम होत असतो. वैदय/अवैदयरित्या वाळुच्या उपसा करणारे वाळु घाटा लगतचा गावा अंतर्गत रस्त्यांवरून मोठया जडवाहनांव्दारे वाहतुक करतात. त्यामूळे रस्त्यांची अवस्था दयनिय झाल्याची ओरड कायम असतांना आता वाळु अतीउपसामूळे गावातील जीवनच धोक्यात आले आहे. चितेगावा लगत उमा नदी वाहत असल्याने याभागात तयार होणारी वाळु शासनाला महसुल मिळवुन देणारे आहे. दरवर्षी महसुल प्रशासन लिलावाव्दारे या वाळु घाटाचे कंत्राट देत असते. कंत्राटदार त्याला दिलेल्या कंत्राटाच्या दहापटीने वाळुच्या उपसा करतोच त्यासोबत ईतरही व्यवसायीक चोरीछिपे वाळु उपसा करून वाहतुक करतात. यावर्षी चितेगावसह तालुक्यातील 17 घाटाचे कंत्राट देण्यात आलेले नाही. त्यामूळे चोरटयांना मोकळे रान मिळाले आहे. नदी पात्रातील वाळुच्या अतीप्रमाणात होत असलेल्या उपसा आणि वाहतुकीमुळे चितेगावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष पहायला मिळत आहे. मात्र प्रशासनाने याप्रकरणाची अदयापही गंभीर दखल घेतली नसल्याच्या आरोप चितेगावचे माजी उपसरपंच देवानंद गेडाम यांनी केला आहे.
नदीपात्रातील वाळुच्या उती उपश्याच्या चितेगावात दिसत असलेला विपरीत परीणाम भविष्यात तालुक्यातील ईतर अनेक गावात दिसण्याची शक्यता वर्तविणे अतिषोयोक्ती ठरणार नाही. 

चितेगाव : विहिरीत पाणी नसल्याने बंद पडलेला आर ओ
चाळा घाटावरून वाळुची वाहतुक : तालुक्यातील केवळ बोरचांदली आणि येरगाव घाटावरील वाळु उपसा आणि वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र चिचाळा घाटावरून वाळुची मोठया प्रमाणात वाहतुक केली जात आहे. चिचाळा घाटावरून वाळुची चोरी करून बोरचांदली मार्गे मूल शहरात आणि ईतरत्र नेली जात आहे. बोरचांदली घाटावरील वाळु असलयाचे दर्शविण्यासाठी चोरटे ही शक्कल लढवित असल्याचे बोलले जाते. वाळुचया अवैदय उत्खनन आणि वाहतुकीकडे तालुक्याचे महसुल प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने चितेगाव सारखी परीस्थितीत आपल्याही गावात निर्माण होण्याची भिती वाळुघाटा लगतचे गावकरी व्यक्त करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.