30 एप्रिलला तिव्र आंदोलन,ठिकठिकाणी यंग चांदा ब्रिगेड करणार जनजागृती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कधी नव्हे ऐवढे भिषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पूरेसा पाणीसाठा उपलब्ध असून सूध्दा ही पाणी कपात नियोजन शुन्य कारभारामूळे चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. असे असतांना चंद्रपूरकर संयम बाळगून आहे. मात्र आता आपल्या हक्कासाठी संघर्ष उभारण्याची वेळ आली असून नागरिकांनीही आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे तसेच पाणी नाही तर करही नागरिकांनी भरु नये असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेतून नागरिकांना केले आहे.
चंद्रपूर हा शांतीप्रिय जिल्हा आहे. याचाच फायदा महानगर पालिका घेत असून आर्थिक जुळवा - जुळव करण्यासाठी उज्वल कंन्ट्रक्शला हाताशी धरुन शहरात पाण्यासाठी पाणीपत अशी परिस्थीती निर्माण केली आहे. शहरातील अणेक भागात 10 दिवसांपासून पाणी पूरवठा ठप्प आहे. त्यामूळे भर उन्हाळयात नागरिकांना उन्हाचे चटके शोसत पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शहरातील बाबूपेठ, भिवापूर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, घूटकाळावार्ड, इंदिरा नगर, बालाजी वार्ड, नेहरू नगर, तुकूम, रामनगर, दादमहल वार्ड, भाणापेठ वार्ड, म्हाडा कॉलनी या भागातील परिस्थिति अतिशय बिकट आहे. शहराला पाणी पूरवठा करण्याची जवाबदारी असलेल्या उज्वल कंन्ट्रक्शनलाही महानगर पालिकेच्या काही मोठया पदाधिका-यांचा आशीर्वाद असल्याने त्याचा मुजोरीपणा कायम आहे. पाण्याच्या थेंबा - थेंबाला नागरिक भटकत असतांना दूसरीकडे मात्र सुशोभिकरणाच्या नावावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय केल्या जात आहे.
अणेक ठिकाणी पाईप लाईन फुटली असल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचेही चित्र आहे. त्यामूळे ही पाणी कपात पाणी टंचाईमूळे नसून मानव निर्मीत असल्याचे स्पष्ट होत आहे. आज रविवारी किशोर जोरगेवार यांनी शहराला पाणी पूरवठा करणा-या इरई धरणाची पहाणी केली असता धरणात मूबलक पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणात पाणीसाठा असतांनाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागणे हे नियोजन शून्य कारभारचे लक्षण असून यात मोठी आर्थिक जूळवा - जूळवीचे समीकरन आहे. असा आरोपही किशोर जोरगेवार यांनी केला आहे. पाणी कपातीबाबत मनपा आयुक्त बोलायला तयार नाही. मात्र आमचा संयम आता संपला आहे. आजवर आम्ही पाणी दया अशी वारंवार विनंती केली होती.
परंतू यापूढे आम्ही विनंती करणार नाही तर आमच्या हक्काचे पाणी हिसकावून मिळवू या लढाईत कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा पुर्णताह मनपा प्रशासन जवाबदार असेल असा ईशाराही किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिला आहे. येत्या30 एप्रिलला पाणी दया अन्यथा खुर्चा खाली करा या मागणीला घेवून तिव्र आंदोलन करण्यात येणार असून पाणी समस्या असलेल्या प्रत्येक प्रभागात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
नागरिकांनीही त्यांच्या भागात पाणी पूरवठा सुरळीत होत नसल्यास तशी लेखी तक्रार राजमाता, कोतवाली वार्ड, चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेड च्या कार्यालयात दयावी असे आव्हान यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांनी केले आहे.