२६ मे रोजी होते लग्न
नागपूर / अरुण कराळे :
लग्नाचे स्वप्न पहात असलेल्या तरूणाने लग्ना आधीच आपल्या राहत्या घरीच गळफास घेतल्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे . नागपूर तालुक्यातील दवलामेटी येथील आशिष गायकवाड वय ३३ वर्ष याने रविवार २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेतल्यामुळे परीसरात एकच खडबळ उडाली.
प्राप्त माहितीनूसार आशिष हा दवलामेटी येथे किरायाच्या घरात राहत असून खाजगी कंपनीमध्ये काम करीत होता. २६ मे रोजी त्याचा विवाह ठरले होता .पत्रिकेचे वाटप ही झाले होते. परंतु अचानक त्याने मृत्युला कवटाळल्यामुळे या घटनेला वेगळे वळण आलेले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतक आशिष याने काही दिवसांपूर्वी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता,हे विशेष. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अद्याप आत्महत्येचे कारण समजले नाही. वाडी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनसाठी शासकिय रुग्णालयात पाठविले आहे.पुढील तपास वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाठक यांच्या मार्गदर्शनात करीत आहे.