नागपूर/प्रतिनिधी:
सद्या नागपुर पोलिसांच्या निशाण्यावर शहरातील देहविक्री अड्डेच जास्त टार्गेट ठरलेले दिसू लागले आहे,पोलीस शहरातील प्रत्तेक कुंटखाण्यावर छापा टाकत आहेत,सोमवारी संध्याकाळी पाचपावलीतील राय सोसायटीत छापा टाकला व बांगला देशातील दोन आणि छत्तीसगडमधील एक अशा तीन वारांगना देहविक्रय करताना पोलिसांच्या हाती लागल्या.भाड्याच्या घरात हा कारभार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले, बनावट ग्राहक पाठवून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने हि कारवाई केली.नौकरीचे आमिष दाखवून मुलींना देह्व्यापारात आणल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणात मोहम्मद सरफराज इलियाज मेमन याला पोलिसांनी अटक केली आहे.
त्यावरून पोलिसांनी मेमनविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनावणे, प्रीती कुळमेथे, हवालदार मुकुंदा गारमोडे, संजय पांडे, मनोजसिंग चौहाण, चंद्रशेखर घागरे, प्रफुल्ल बोंदरे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, अनिल मारकड तसेच सामाजिक कार्यकर्त्या सविता रेलकर, विजयाराणी रेड्डी यांनी ही कामगिरी केली.
पोल्ट्रीफीड |