Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल २१, २०१९

धक्कादायक:चंद्रपुरात ३० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू

नागपूर/ललित लांजेवार:
kavyashilp Digital Media

चंद्रपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, चंद्रपूर येथून नजीक असलेल्या लोहारा येथील गौरक्षण केंद्रात आणण्यात आलेल्या जवळपास ३० पेक्षा अधिक जनावरांचा गुदमरून मृत्यूबाब समोर आली आहे. चंद्रपूर येथून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहारा येथे असहाय्य पशु सेवार्थ श्री उज्वल गौरक्षण संस्था चंद्रपूर केंद्र आहे. या केंद्रात वयस्क झालेले जनावर ज्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक तस्करी रोखल्यानंतर ज्या जनावरांची सुटका करण्यात येते अशी जनावरे या ठिकाणी आणल्या जाते, त्यातील ५० पेक्षा अधिक जनावरांचा मागील ३ ते ४ दिवसापासून मृत्यू झाला आहे.

राजुरा तालुक्यातील विरूर येथे पोलिसांनी अवैध जनावर तस्करीतील १२७ जनावरे पकडली होती यातील हे पकडण्यात आलेले १२७ जनावरे या श्री उज्वल गौरक्षण संस्था लोहारा येथे आणली होती यातील २९ जनावरांचा यात गुदमरून मृत्यू झाला 

या केंद्रात आणखी बरेचशे जनावरे आहेत,यातील काही जनावारांचा कापलेल्या (संशयास्पद)अवस्थेत दिसत असल्याचे निदर्शनात आले आहे.त्यांच्या शरीरातील अंतर्गत भाग बाहेर आला आहे.हि मेलेली सर्व जनावरे गावाला लागून असलेल्या मोकद्या ठिकाणी टाकून देण्यात आली आहे.

त्यामुळे लोहारा परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.शहरातून बाहेर निघत असताना मुख्य मार्गावर लोहारा हे गाव असून या परिसरात मोठे खाजगी उद्यान आहेत, सुट्टीच्या दिवशी लोक दुरून याठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात त्याच सोबत मोठे हॉटेल आणि धाबे देखील आहेत.आणि त्याच परिसरात हे मृत अवस्थेत असलेले जनावर टाकून दिल्याने गावात व त्या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे,त्यामुळे याचा परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे व रोगराई फैलण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने या जनावरांना तत्काळ त्या ठिकाणहून उचलून त्यांना अग्नी देण्यात यावी किव्हा दफन करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.