काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे संताप
नागपूर/ललित लांजेवार:
राजुरा येथील इन्फंट जिजस पब्लिक स्कूल शाळेच्या वसतिगृहात सात अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटनेने देश हादरले असतांनाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची जीभ घसरली.
ते पत्र परिषदेत बोलतांना म्हणाले कि पॉक्सो कायद्याअंतर्गत शासनाकडून तीन-पाच लाखांची मदत मिळत असल्यामुळे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यासाठी पालक पुढे येत आहेत,असे विधान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केल्याने आता संतापाची लाट उसळली आहे.
निर्भया' किंवा पॉस्को कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून 3 लाख किव्हा 5 लाख रुपयांची मदत मिळते. त्यामुळे अनेक तरुणी आणि त्यांचे पालक पैशासाठी गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, हासुद्धा पब्लिसिटीचा धंदा झाला आहे, असं वक्तव्य करताच सुभाष धोटेंवर असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याची टीका व्हायला लागली.
लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात निषेध मोर्चे रास्ता रोको तसेच विविध संघटना व राजकीय पक्षांकडून सर्व समावेशक अशी बंदची हाक देण्यात आली होती.
शाळेच्या वसतिगृहात सात अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचं वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले . त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली .तपास सुरू असतांनाच सुभाष धोटेंच्या या वक्तवयमुळे आता संतापाची लाट उसळली आहे.
तपासणीनंतर नेमकी किती मुलींच्या बाबत ही दुर्दैवी घटना घडली, हे समोर येईल, असं आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.