विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीतर्फे आयोजन
समस्त माना समाज बांधवांनी निम्बु शरबत पाणी पाजून उपोषण मागे घेतले व उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपोषणकर्ते नारायण जांभूळे यांना हलविण्यात आले.
तहसिलदार नागतीळक यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन
चिमूर/रोहित रामटेके
चिमुर : - दिनांक.२६/०२/२०१९ पासून तहसिल कार्यालय चिमूर च्या समोर मा. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी व अन्य
मागण्यासाठी दिनांक.१९/११/२०१८ ला मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षते खाली प्रमुख मागण्या मंजुर करण्यात आल्यात त्यानुसार परिपत्रक काढण्याचे ठरले होते परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीत याकरीता विदर्भ आदिवासी माना समाज कृती समिती तर्फे नारायण जांभूळे याचे विविध मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु असून
१) जात वैधता प्रमाणपत्र सहा महिण्यात निकाली काढण्यात यावा.
२) आप्त संबंध (affinity) गहीत धरण्यासाठी २४/०४/१९८५ चा जि.आर
व मानववंश शास्त्रात ''माना" संबधी दिलेल्या माहितीच्या आधारावर देण्यात यावे.
३) व्यावसायीक शिक्षण घेत असलेल्या सर्व विदयार्थींच्या जात वैधता प्रमाणप्रत्र तीन महिन्यात देण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यासाठी परिपत्रक काढन्यात यावे.
४) जनहित याचिका ७१/२०११ नूसार प्रक्रिया जलद व्हावी, याकरिता प्रकिये मध्ये सुधारना करण्यात यावी
५) जनहित याचिका १०२/२०१३ आदेश दि.१५/०४/२०१६ नुसार करण्यात यावं.
६) दि.०९/०८/१९९५ ओबीसीच्या जी. आरच्या यादित क्र. २६८ वर"मागा
चा'माना करण्यात आल्याने शुद्धिपत्रक प्रसिद्ध करन्यात यावे.
७) मा. न्यायालयाच्या विविध आदेशानुसार माना ,माने ,मानी, माना कुनबी इत्यादी
एप असल्याबाबत परिपत्रक काढन्यात यावे.
८) डोमा या गावाजवळील मुक्ताई स्थळास पर्यटन स्थळ जाहिर करण्यासाठी परिपत्रक काढन्यात यावे.
९) वैरागड माणिकगड आणि सुरजागड किल्ले यांना वारसास्थळ जाहिर करण्यात यावे.
१०) सुरजागड किल्ला स्थित, डोंगरावरील ठाकुर देव, देवस्थानाच्या जवळपास खनन करण्यात येणार नाही. या सर्व मागण्यांना घेऊन मागील ८ दिवसापासून नारायण जांभुळे आमरण उपोषणनाला बसले आहेत. उपोषणाच्या ७व्या दिवशी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी आमरन उपोषण कर्ते नारायण जांभूळे यांना उपोषण स्थळावर भेट देऊन माझ्यावर विश्वास ठेवा मी आपल्या मागण्या पूर्ण करेन असा आश्वासनही यावेळी देण्यात आला. आज उपोषणाचा ८ व दिवस त्यामध्ये आदिवासी माना समाज व कृती समिती तर्फे नारायण जांभूळे यांच्या हस्ते तहसीलदार संजय नागतीलक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी प्रकल्प ऑफिस चे प्रकल्प अधिकारी बावनकर यावेळी उपस्थित होते. तसेच तहसिल कार्यालयाच्या समोर समस्त माना समाज कृती समिती तर्फे चक्का जाम आंदोलनही यावेळी करण्यात आला या चक्काजाम आंदोलनास उपस्थित असलेले अरविंद सांदेकर तसेच माना समाज व कृती समितीचे आदी कार्यकर्ते यांना तात्काळ चिमूर पोलिसांनी पोलिस लॉरीत डांबून डिटेन्ड केले व पोलिस स्टेशन ला नेण्यात आले यावेळी कुठल्याही प्रकारे शांतता व सुव्यवस्था भंग होऊ न देता चिमूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे व ट्राफिक पोलिस तसेच अन्य पोलिस व बंदोबस्त पथक यांनी शांतता राखण्यास सहकार्य केले.