Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च १६, २०१९

गडचिरोलीत नक्षली घातपाताचा कट

पोलिसांनी नष्ट केला बाॅम्ब

गडचिरोली/प्रतिनिधी
 मुरूमगाव पोलिस मदत केंद्राच्या
हद्दीत नक्षल्यांनी आखलेला घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. हिरंगे नजीक
असलेल्या पहाडीवर नक्षल्यांनी पेरून ठेवलेला बाॅम्ब पोलिसांनी नष्ट केला आहे. सदर घटना आज
१६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. सीआरपीएफच्या ११३ व्या बटालियनचे जवान व
जिल्हा पोलिस दलाचे जवान नक्षलविरोधी शोध मोहिम राबवित असताना २ किलो वजनाचे
बाॅम्ब आढळून आले. बाॅम्ब असल्याचे दिसून येताच गडचिरोली येथील विशेष पथक बोलावून निकामी
करण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली मोठ्या प्रमाणात घातापाताच्या
योजना आखत आहेत. मागील काही दिवसांमध्ये दोन ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
तसेच दुर्गम भागात, बॅनर, पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यात निवडणूक कालावधीत अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
यामुळे नक्षली कारवायांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.