चंद्रपूर/प्रतिनिधी:
नाभिक समाजाचे वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन. जोरगेवारांच्या हस्ते उद्घाटन बदलत्या काळा बारोबर अणेक समाज पारंपारीक व्यवसाकडून दुरावत आहे. मात्र नाभिक समाजाने आजही आपला व्यवसाय कामय ठेवला आहे. मात्र त्यांनी एवढ्यावरच न थांबता अत्याधूनीक प्रशिक्षण घेवून नव्या जोमाने पारंपारिक व्यवसायाकडे वळावे यात हवे ते सहकार्य मी करणार अशी ग्वाही लोकनेते किशोर जोरगेवार यांनी दिली. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक सभागृहात नाभिक समाजाच्या उपवधू-उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कल्यान दळे यांची या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती तर प्रभाकराव फुलबांधे, राजेंद्र नागमोते, दिपक नक्षीने, अब्राजी साळुंखे, जनार्धन मारे यांच्यसह ईतर मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, नाभिक हा समाजाची सेवा करणारा समाज असून सामाजीक कार्यातही या समाजाचे मोठे योगदान आहे. आजच्या या मेळाव्यातून समाजाने चिंतन करुन समाजाच्या विकासाची पूढील रुपरेषा ठरवावी. या मेळाव्यात आलेल्या यूवकांनी समोरही समाजहीतासाठी मोठया संख्येने एकत्रीत यावे आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नेवे तंराध्यान अवगत करण्याची गरज आहे. नाभिक समाजाने यासठी कार्यशाळेचे आयोजन करून आपल्या समाजातील युवकांना नवे अत्याधुनिक प्रशिक्षण द्यावे आपला स्वयं पारंपारिक रोजगार विस्तारीक करत रोजगार देणारा समाज म्हणून आपली ओळख तयार करावी असेही यावेळी बोलताना जोरगेवार म्हणाले.
यापुढेही समाज बांधवांच्या वतीने समाजाला एकत्रीत करणारे असे कार्यक्रम आयोजीत करावे असे आवाहण करत यासाठी शक्य ती मदत माझी तयारी असल्याच शब्द यावेळी बोलतांना किशोर जोरगेवार यांनी समाज बांधवांना दिला. या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.