ललित लांजेवार:
पूर्व विदर्भातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर कॉंग्रेसच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे.हा भाजप-सेना युतीचा पहिला साईड इफेक्ट चंद्रपूर जिल्ह्यातील दिसणार आहे,धानोरकर हे पक्षाचा राजीनामा देण्याची दाट चिन्हे आहेत.व काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.चंद्रपूर भाजपचे खासदार तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आतापरीयंत विधानसभेसाठी मदत केली नाही, असा बाळू धानोरकर यांचा आरोप आहे. काँग्रेस सोडून लोकसभा निवडणूक लढवून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची आमदार बाळू धानोरकर यांची तीव्र इच्छा आहे.त्यामुळे नाराज आमदार धानोरकरांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर हि बाब टाकली आहे,तसेच काँग्रेसचे काही नेते देखील बाळू धानोरकर यांच्या संपर्कात आहेत असे देखील धानोरकर यांनी सांगितले.