१४०० कोटी रुपयाची होणार बचत, नागरिकांना होणार फायदा
नागपूर ०२: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत आता महा मेट्रोने नागपूरने मेट्रो प्रकल्पासाठी ६डी बीआयएम ( 6 D BIM ) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. महा मेट्रो नागपूर देखील डिजिटल माध्यमाने प्रकल्पाचे कार्य निर्धारित वेळेत पूर्ण करत आहे. मुख्यम्हणजे यामुळे डीपीआर मध्ये मंजूर खर्चातही बचत होत आहे. महा मेट्रो नागपूरच्या 'डीपीआर'प्रमाणे मेट्रोचे संचलन आणि रखरखावसाठी २५ वर्षाच्या कालावधीत १४,४९१ कोटी रुपयाची लागत अपेक्षित आहे. तर डिजिटल माध्यमाचा वापर करून या २५ वर्षाच्या कालावधीत महा मेट्रो १,४५० कोटीची बचत करेल. प्रकल्पाचे बांधकाम करत असतांना बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर केल्यास १० ते १७ टक्क्यापर्यंत बचत करता येते. यामुळे भविष्यात नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
बांधकाम क्षेत्रात प्रचलित असलेल्या ६डी बीआयएम तंत्रज्ञानाने अनेक पायाभूत सुविधेने परिपूर्ण प्रकल्पाचे निर्माण केले आहे. सामान्य: एखाद्या मेट्रो प्रकल्पाचे निर्माण करत असताना त्यात ४ ते ५ वर्षाचा कालावधी आराखडा आणि बांधकाम प्रक्रियेत लागतो. तर ४० ते ४५ वर्षाचा कालावधी हा संचालन, दुरुस्ती आणि देखभालीच्या कार्यासाठी लागतो. याचा संपूर्ण अभ्यास केला असता मेट्रोच्या लागत खर्चापैकी तब्बल ८० टक्के खर्च हा संचलनासाठी लागत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे या खर्चात बचत करण्यासाठी महा मेट्रोने नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ६-डी बीआयएम तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. प्रकल्पाचे कार्य सुरु असतांनाच डिजिटल माध्यमाची निवड केल्याने भविष्यात संचालन आणि रखरखावसाठी मोठी बचत महा मेट्रोला होणार आहे.
५डी बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या महा मेट्रोने आता ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एक नवे आयाम स्थापित केले आहे. ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा साह्याने संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी नवी डिजिटल प्रणाली प्रारंभ केली आहे. यामुळे संपत्तीची माहिती साठवून ठेवण्यास मदत मिळते. आजच्या २१व्या युगात तांत्रिक ज्ञानाच्या प्रवाहात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध मार्गाने प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करता येते. जगभरात भव्य बांधकामासाठी या तंत्रज्ञाचा उपयोग होत असलेतरी मोजक्या संघटनानेच याचा संपूर्ण लाभ घेतला आहे. निर्माणाधीन बांधकामात बीआयएम'चा वापर केल्यास प्रकल्पाला मोठा फायदा होतो. महा मेट्रो नागपूर प्रकल्पाच्या संपूर्ण निर्माण प्रक्रियेत बीआयएम'चा होत आहे.