सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी (नलेश्वर) येथे राहणाऱ्या गावातील एका इसमाने स्वतःच्या राहते घरात छताला टॉवेल बांधून गळफास घेतले.
सविस्तर वृत्त असे की, मृतक दिनकर शंकर गेडाम वय ४५ वर्ष रा. मोहाडी (नलेश्वर) यांचे पत्नी व मुलगा गावात च नाटक बघायला गेले असता .पहाटे सकाळी ४ वाजता आल्यावर बघितले की , घराचा आत मधून दरवाजाची कडी लावली आहे. घराच्या आत मध्ये बघितले असता छताला टॉवेल बांधून गळफास लावला दिसला . त्याचे नाव मृतक दिनकर शंकर गेडाम असे आहे.
अशी माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतकाचे शव ताब्यात घेतले. व मृतकाचा कुटुंबीयांना विचारणा केली असता. मृतकाला पोट दुखण्याचा असाह्य वेदना होत होते. त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असावे , असे सांगितले. यावरून सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस यशवंत ठोंबरे यांनी अप .क्र. ४ नुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.