मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने विजया रहाटकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केलीय.त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील.
महिला अध्यक्षपदी असताना त्यांनी महिलांवर होणाऱ्या विविध अन्यायाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. यापुढे त्यांचे अशाच प्रकारचे कार्य असेल.
मुलींना-महिलांना लक्ष्य केल्या जाणाऱ्या प्रकरणांचा अभ्यास करून अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी ही समिती काम करते. अशा अनेक घटनांचा निपटारा त्यांनी आपल्या कारकिर्दीत केल्यामुळे त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्निवड झालीय.