शिवसाम्राज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीचे आयोजन
चिमुर/रोहित रामटेके
चिमुर येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान च्या वतीने 19 फ्रेब्रुवारी रोजी जानता राजा व हिन्दवी स्वराज्याचे स्वंस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली, शिवजयंती निमित्य भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते,
शोभयात्रेमुळे चिमुर क्रांति नगरी जय शिवाजी जय भवानी च्या जय घोषानी चिमुर नगरीत शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते, घोड्यावर बसविलेले शिवाजी महाराज उपस्थितांचे लक्ष वेधुंन घेत होते, छत्रपति शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ति, रंगिबिरंगी विद्युत रोशनाई, भजन, दिंडी, पालख्या, डी जे व् धुमाल च्या संगीतावर बेधुन्द होउन्न युवक युवती थिरक्तानि दिसली, शहरामधे शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते,
चिमुर नगरित निघलेली शोभायात्रा सामाजिक एकतेचे प्रतीक ठरली असून सर्व धर्मीय समाज बांधव शोभयात्रे मधे उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन शुभम सातपुते, प्रास्तविक श्रद्धा डोईजड व आभार हरि कामडी यांनी मानले, कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी बालू हेल्वतकर, सागर इलकर, विष्णु अगड़े, रितेश चौरे, निखिल डोईजड, वैभव लांडगे, प्रशांत गायकी, स्वप्निल सावसाकड़े, दीपक पुंड, तेजस मिसार, आदींनी परिश्रम घेतले