सिंदेवाही - -वाहन धारकांना वाहन चालविताना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे . परंतु ,मात्र या बंदीच्या सर्वत्र फज्जा उडाल्याने दिसून येत आहे . या आधुनिक युगात आता जवळपास प्रत्येकाकडेच मोबाईल आला आहे. त्यात अवघड आहे. ते म्हणजे वाहन चालव तानि बोलने . त्यात समाविष्ट आहेत . खाजगी चारचाकी, दुचाकी ,वाहनधारक पण त्यांना हे माहित नाही की वाहनधारकांना मोबाईल काळ ठरू शकतो. सोबतच वाहनातील प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचू शकते. खास करून शाळे समोरून जाणारे विद्यार्थी युवा मुले तसेच नागरिक वाहन चालविताना कानाला मोबाईल लावून दुचाकी चालवत असतात. यातून एकाद्या अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे आता वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण साधताना दिसून आले तर यासाठी -- कलम २५० (अ)/१८४ मो.वा.का. व तसेच यावर एक हजार रुपये चे कारवाई आहे. हे माहिती असून सुद्धा
दुचाकी , चारचाकी ,वाहन धारक तर सर्रास मोबाईलचा वापर करीत वाहन पुढे नेतात. मोबाईल कानाला लावून मान तिरपी करून ते इतरांशी संभाषण साधतात. इतर वाहनधारकही वाहन चालविताना संभाषण करतात. गजबजलेले वस्तीत, चौक आदी ठिकाणी याला लगाम घालण्याची गरज आहे. यावर वाहतूक पोलीस पायबंद घालणार का व कारवाई करणार का असा प्रश्न सिंदेवाही तील नागरिकांनी केला आहे.