उमरेड/अनिल पवार:
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने चांपा येथे कश्मीरमधील पूलवामा येथे झालेल्या दहशतवाध्यांच्या भ्याड हल्ल्यात सी. आर .पि. एफ च्या 42 जवानांना वीरगती प्राप्त झाली .असून शहीद झालेल्या जवानांना कँडल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली .
याप्रसंगी चांपा गावातील सरपंच अतीश पवार व उपसरपंच अर्चना सिरसाम , प्रफुल सपाटे, अस्मिता अरतपायरे, तनिष्का गट प्रमुख मीरा मसराम , अनिता खंडाते , मुकेश भोसले आदींनी शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली .याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरपंच अतीश पवार यांनी शिवाजी महाराजांचे आदर्श व जीवन गौरव संबंधित मार्गदर्शन केले .
आज तरुणांनी शिवाजी महाराजांचे जिवन चरित्र अंगीकारावे असे आव्हान सुध्दा केले .शिवाजी जयंती निमित्याने गावातील समस्त ग्रामस्थांकडुन पूलवामा येथिल भ्याड हल्यात शहीद झालेल्या 42 वीर शहिदांना श्रध्दांजली देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी चांपा ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यावेळी ग्रामस्थांकडुन शहिदांना श्रध्दांजली देण्याकरिता चांपा गावातील सर्व महिला बचत गट , तनिष्का गट सोबतच गावातील सर्व महिला वर्ग व गावातील युवक प्रतिष्ठित नागरीक व आदीवासी युवा सेनातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन कँडल मार्च काढला .
कार्यक्रमाचे आयोजक सरपंच अतीश पवार यांच्या मार्गदर्शनात कँडल मार्चला सुरवात झाली .चांपा गट ग्रामपंचायत पंटांगणात 42जवानांना श्रध्दांजली देत देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांना वीरगती मिळाली .गावातील समस्त ग्रामस्थांकडुन शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली .
आदिवासी स्मारक पासून कँडल मार्चला सुरवात झाली ,यावेळी तरुणांनी कश्मीरमधील पूलवामा येथे झालेल्या दहशतवाध्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे दिले व संपुर्ण गावात भ्रमण करून गट ग्रामपंचायत चांपा च्या पटांगणात शहिदांना सलामी देऊन कँडल मार्च चा समारोप करण्यात आला .