Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १३, २०१९

माण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप जठार

उपाध्यक्षपदी अमोल खाडे यांची निवड...

मायणी:ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.प्रभातचे संदीप जठार यांची तर उपाध्यक्षपदी दै.ऐक्यचे अमोल खाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

  दहिवडी ता.माण येथील विश्रामगृहात माजी अध्यक्ष बापूसाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे ,लालासाहेब दडस , एल.के. सरतापे ,विठ्ठल काटकर , दिपक तंडेबडवे , यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत निवडी जाहीर करण्यात आल्या.यावेळी दै.लोकमतचे सचिन मंगरूळे यांची सचिवपदी तर शरद देवकुळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.

 यावेळी नवनाथ जगदाळे ,सचिन बडवे ,विशाल गुंजवटे ,पिंटू माळवदे ,फिरोज तांबोळी , दौलत नाईक ,रूपेश कदम ,दिपक काटकर, धनंजय कावडे ,महेश जाधव , महेश कांबळे ,शंकर पानसांडे उपस्थित होते.

 या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


 - दहिवडी ता.माण येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व पत्रकार....


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.