राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ज्या शहराचे आहेत त्या नागपूर शहरातील पोलीसच सुरक्षित नसल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेईल असे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.चार दिवसांपूर्वी पूर्व नागपूर बस स्टॉपवर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतुक शाखेच्या पोलिसाला मारहाण करण्यात आली तर मंगळवारला उपराजधानी पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडी शहरात अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आंबेडकर नगर वाडी परिसरात मंगळवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान एका ओमनी गाड़ीने अपघात झाला असता पोलिसांनी गाडी थांबविली तेव्हा कारचालक गाड़ी सोडून बाहेर गोळा झालेल्या गर्दीत उभा राहीला पोलिसांनी चालक कोण आहे असे विचारले असता गर्दीतून एक युवक आला आणि मला गाडी चालविता येते असे म्हणून गाडी पोलीस स्टेशनला घेऊन चालण्यास तयार झाला तेव्हा कॉन्स्टेबल बाबा खोडे गाडीत बसून पोलीस स्टेशनकडे निघाले तेव्हा अज्ञात चालकाने गाडी पोलीस स्टेशनकडे न वळवता वेगळ्या दिशेनी धम्मकीर्ती नगरच्या खाली परिसरात नेऊन पोलीस कॉन्स्टेबलला दगडाने मारहाण केली यामध्ये कॉन्स्टेबल जखमी झाला असून परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच नागरिक गोळा होत असतानाच चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला.जखमी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला परंतु बातमी लिहीस्तो अजूनही आरोपी व गाडीचा पत्ता लागला नाही .