केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सकाळीच घेतली होती भेट
चंद्रपूर - एक निस्वार्थी समाज सेवक, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गणपतरावजी अमृतकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी बुधवार दि 20/2/2019 ला दुपारी 2.00 वाजता निधन झाले. उद्या 21 फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
२० फेब्रुवारीला त्यांच्या जीवनचरित्र्यावर आधारित कॉम्रेड एक निस्वार्थी समाज सेवक या पुस्तकाचे प्रकाशन तथा अभिष्ठचिंतन सोहळा 20/2/2019ला दुपारी 4.00 वाजता आयोजित केला होता. गणपतरावजी अमृतकर यांच्या पुस्तक प्रकाशन तथा अभिष्ठचिंतन सोहळयानिमित्य बुधवारी सकाळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर वृद्धापकाळाने दुपारी २ वाजता समाधी वॉर्ड चंद्रपूर राहते घरी निधन झाले. त्यांच्या मागे माजी नगरसेवक गोपाळ अमृतकर, माजी महापौर संगीता अमृतकर, मुली बिंदिया, वर्षा, सुरेखा, शोभा आणि अनीता आदी मुली, जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.
--------------
समाजसेवी कॉम्रेड
कोतवाली वार्ड चंद्रपूर येथे त्यांचा जन्म १ एप्रिल १९३१ रोजी झाला. विद्यार्थी जीवनापासूनच अन्यायाविरुद्ध चीड़, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. काँग्रेस सेवादलाचे ते कार्यकर्ते होते. परंतु त्यांनी डावी विचारसरणी अंगिकारली. डाव्या पक्षांनी छेडलेल्या आंदोलनात ते सहभागी राहिले. गणपतराव अमृतकर व त्यांची पत्नी ताराबाई अमृतकर यांना पाच कन्या व एक पुत्र आहे. पत्नी ताराबाई यांचे मागील २०१३ रोजी निधन झाले. गणपतराव अमृतकर यांचे शिक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल चंद्रपूर येथे झाले. वडील गोविंदराव अमृतकर यांच्या शेती व्यवसायात त्यांनी हातभार लावला. त्यांच्या वडिलाचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव जनाबाई होते . त्यांना महादेवराव, गणपतराव, नामदेवराव व बहीण बच्छला ही मुले होती.
१९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा आलापल्ली, भामरागड , गडचिरोली , वडसा नक्षलवादी क्षेत्रात आदिवासीच्या समस्या समजून घेण्यासाठी सायकल तथा मोटरसायकलने त्यांनी प्रवास केला. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. जनजागृती निर्माण केली. आदिवासी पीडित, कष्टकरी समाजाकरिता सतत संघर्ष करून समाजसेवा केली.
भाई ए . बी . वर्धन यांचेशी संबंध आला ते भारतीय कॅम्युनिष्ट पक्षाच्या सर्वोच्च पदावर होते. पक्षाचे सरचिटणीस तसेच केन्द्र सरकारच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या समन्वय समितीचे ते सदस्य होते. त्यांचे हस्ते त्यांचा सत्कार झाला. शेतकरी , शेतमजूर कामगार , वनमजूर व सफाई कामगार यांना संघटीत करून त्याचे जीवनमान उंच करण्यासाठी व त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी लढा दिला . सार्वजनिक जीवनात आपण काम केले. चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा जंगलाने व्याप्त जिल्हा भूमीहीन शेतक-यांनी जबरात जोत जमिनी वाटल्या. त्या जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून आदोलने केली . पोलिसांचे के बसले. तुरुगातही जावे लागले. झोपडपट्टीत राहणा-या नागरिकांना घरासाठी पट्टे मिळावे , यासाठी आंदोलने केली . त्यांना त्याय मिळवून दिला . दुर्गापूर औष्णिक विद्युत केन्द्रीत शेतक-यांच्या जमिनी गेल्या . प्रकल्पग्रस्त शेतक-यांना जमिनीचा य मोबदला मिळावा म्हणून सतत लढा दिला आणि यामुळेच या शेतक - यांना दोन वेळा बाढीव रक्कम मिहाली ग. गो. अमृतकर यांना १९७४ मध्ये त्यांचे बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांचेवर आरोप होता. या आरोपातून त्यांची निदोष सुटका झाली . उरण येथील एक प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या. पण त्या जमिनीचा । योग्य मोबदला दिल्या गेला नाही तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झाले. चंद्रपूर जिल्ह्यातही आंदोलन झाले. या आंदोलनात जिल्ह्यातील अनेकांना चंद्रपूरच्या तुरुंगात टाकले होते. त्यात श्री . ग . गो . अमृतकर यांचाही समावेश होता. म्हणजेच अन्यायाविरुद्ध त्यांनी जीवनभर लढा दिला आहे. सामाजिक व राजकीय लढे त्यांनी दिले . गोवामुक्ती लढ्यात शहीद बाबूराव थोरात यांचा मृत्यू झाला. ते ग . गो . अमृतकर यांचे मित्र होते. थोरात यांचं स्मृती कायम राहावी म्हणून आझाद बागेत त्यांचे स्मृती स्मारक उभारण्यात आले. गोवा मुक्ती संग्रामात बाबूराव थोरात मृत्यू पावल्यामुळे त्यांचे कुटुंब पोरके झाले . त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला . त्याचे कुटुंबाला राहण्यासही जागा मिळावी म्हणून चद्रपूर हॉस्पिटलचे बाजूचे खुल्याजागेची मागणी केली आणि ही जागा थोरातांचे कुटुंबाला मिळाली. आज त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच त्यांना राहण्यासाठी आझाद बागेच्या जवळच अगदी रहदारीच्या रोडवर जागा मिळाली . या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. चंद्रपूर नगरपरिषदेत ते सदस्य म्हणून निवडून आले. जनतेची कामे त्यांनी आवर्जून केली . प्रशासनातील भ्रष्टाचारावर त्यांनी वचक बसविला. सफाई कामगारांना न्याय मिळवून दिला.