प्रोत्साहन पुरस्कार- कुंदन मासोदकर, युवराज वानखेडे, परीतोष कांबळे, प्रसन्न राऊत
नागपूर २५: महा मेट्रो नागपूरतर्फे फेब्रुवारी-२०१९ या महिन्यासाठी घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांकावर तुषार बाळू काळे या स्पर्धकाची निवड करण्यात आली आहे. मेट्रोच्या पिलरवर कर्मचारी कार्यात मग्न असल्याचा आकर्षक छायाचित्र तुषार यांनी स्पर्धेसाठी पाठविले होते. मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे या छायाचित्राची निवड करण्यात आली. तसेच प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांची देखील नावे जाहीरकरण्यात आली आहे. कुंदन मासोदकर, युवराज वानखेडे, परीतोष कांबळे,प्रसन्न राऊत असे या विजेत्यांची नावे आहे. विजेत्यांनी पाठविलेले छायाचित्रे महा मेट्रोच्या वेबसाईट'वर प्रदर्शित करण्यात आली आहे. नागरिकांना विजेत्या स्पर्धकांची छायाचित्रे बघता यावी यासाठी महा मेट्रोतर्फे मेट्रोच्या वेब साईट'वर http:// metrorailnagpur.com/ photography/index.html ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उल्लेखनीय आहे कि, रिच-१ कॉरिडोर अंतर्गत वर्धा मार्गावरील खापरी ते साऊथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच-३ कॉरिडोर अंतर्गत सुभाष नगर ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोच्या प्रवासी सेवेला सुरवात होणार असून सम्पूर्ण शहराचे लक्ष याकडे लागले असतांना इतर दोन्ही रिच मध्ये देखील वेगाने कार्य पूर्ण होत आहे. अशी ग्वाही या छायाचित्रामुळे नागपूरकरांना मिळाली आहे.
नागरिकांची प्रकल्पाविषयीची आत्मीयता व सहकार्य लक्षात घेत छायाचित्रकारांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून 'माझी मेट्रो फोटोग्राफी कॉन्टेस्ट' स्पर्धा प्रत्येक महिन्यात राबविण्यात येते. नागरिकांतर्फे या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात देखील ही स्पर्धा अशीच राहणार असून यात ज्यास्तीत ज्यास्त नागपूरकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महा मेट्रोने केले आहे.