५३७ शिबिरार्थीनी घेतला लाभ
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळेअक्युप्रेशर ही एक प्राचीन चायनीज पध्द्ती असून या पध्द्तीत कोणत्याही प्रकारच्या औषधीचा वापर न करता आपल्या शरीरातील हात -पाय,तळवे तथा मेरुदंड दाब देऊन मशीन द्वारे रक्तवाहिन्या मोकळ्या केल्या जातात या सुवर्णसंधीचा लाभ शहर वासीयांना व्हावा या जनकल्याणार्थ हेतूने नेचर क्योर अँड मैग्नेटिक हेल्थ सेंटर दाभा व स्व . ल .रा. तायवाडे मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तवाडीतील सदाचार सोसायटी मध्ये सॉफ्ट बझ नेट कॅफे परिसरात चार दिवशीय निःशुल्क अॅक्युप्रेशर-चुंबकीय चिकित्सा शिबिराचे उदघाटन आमदार गिरीष व्यास यांचे हस्ते तसेच नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे,उपाध्यक्ष राजेश थोराने,माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे,आरोग्य सभापती शालिनी रागीट,आयोजक भाजप वाडी शहर अध्यक्ष केशव बांदरे,महिला व बाल कल्याण सभापती कल्पना सगदेव,नागपूर तालूका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष डॉ .अजय तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
शिबिरात ५३७ लाभार्थ्याना संधीवात,पायाच्या संध्यातील दुखणे,शरीरावरील गाठी,कंबर,मान, पाठीचे दुखणे,सायटिका, मधुमेह,रक्तदाब,मायग्रेन,अस्थमा पोटाचे विकार,आदी रोगांवर डॉ .महेंद्र वैद्य व डॉ .सुनीता वैद्य यांनी चुंबकीय पध्द्तीने इलाज करून शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.यावेळी राजू सालोडकर,राजेंद्र सावंत,रॉबिन शेलारे, पुरुषोत्तम रागीट,महेंद्र शर्मा,चंद्रशेखर निघोट, सुरेश फलके ,सुनील शेट्टी,अरुण कराळे,सौरभ पाटील,नटवर अबोटी,गजानन तुमडाम,उषा फलके,माधुरी तायवाडे ,सविता पाटील,अंकिता कराळे , गायत्री अबोटी आदीसह शेकडो नागरीकांनी शिबिराला भेट देऊन स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.