Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १२, २०१९

टाटासुमो झाडाला आदळली

सिंदेवाही/प्रातिनिधी

येथून जवळच असलेल्या पळसगाव या गावावरून ६ प्रवासी  घेऊन (विहिरगाव) गडचिरोली येथे एका कार्यक्रमासाठी खाजगी चार चाकी वाहन टाटा सुमो एम एच -17 टि.- 14 44 वाहनाने जात असताना सिंदेवाही जवळच भरधाव  वेगात  चालकाने गाडी उजव्या बाजूला असलेल्या झाडाला जोरदार धडक (ठोस) दिली.  हा अपघात  दुपारी  बारा वाजून तीस मिनिटांनी झाला यामध्ये  प्रवासी  संदेश निकुरे  वय 13 वर्षे  रा.सावरगाव ,लूभाक्षी  बोरकर  वय 23 रा. कन्हाळगाव , आशा निकुरे वय 32 रा.सावरगाव ,रेवता निकुरे वय ४५ रा. सावरगाव ,सुनिता निकुरे वय 40 रा.सावरगाव , कु. देवयानी कार्तीक गायकवाड वय ४ वर्षे रा.पळसगाव आणि गाडी चालक कार्तिक गायकवाड हा सुद्धा त्यात जखमी झाला  त्याने चार चाकी वाहन टाटा सुमो  लापरवाही  व भरधाव वेगात चालवून 6 प्रवाशास जखमी केल्यामुळे वाहन चालकावर  सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून कलम अप/ 98  /19क्र.२७९/३३७/३३७भादवि सहकलम १८४ लावल्या आहेत. सिंदेवाही  पोलीस स्टेशन चे पोलिस स्टाफने त्या सहा प्रवासी व वाहन चालकास प्रथमोपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये नेण्यात आले व त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यामुळे त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये नेण्यात आले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.