चंद्रपूर/प्रतिनिधी:
पाश्चात्य संस्कृती भरतावर वाढता प्रभाव यामुळे भारतीय संस्कृती ला तडा जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याचाच उद्रेक व्हॅलेंटाईन दे च्या रूपाने सध्या विचित्र रूपाने साजरा करण्याचे प्रमाण भारतीय युवकांमधे दिसून येते आहे.यांच विचारसरणीला बाजूला सारून याच दिवसाला "मातृ पितृ दिन" म्हणून साजरा करायचा मानस व्यक्त करून प्रतिष्ठनच्या वतीने "डेबूसावली वृद्धाश्रम" देवाळा चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमाला वृद्धाश्रमाचे व्यवस्यपक श्री. सुभाषजी शिंदे व श्री साई आई टी आई चे प्राचार्य श्री राजेश पेशट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली . कार्यक्रमा अंतर्गत आश्रमातील सर्व वृद्धाना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . मंचावरून प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गाटकीने कोषाध्यक्ष प्रमोद वरभे, सहसचिव विनोद विनोद गोवरदिपे यांनी कार्यक्रमाची संकल्पना व प्रतिष्ठनच्या कार्य विषयी मनोगंत व्यक्त केले. प्राचार्य राजेश प्रशेट्टीवार व संचालक सुभाषजी शिंदे यांनी सुद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. तेथील वृद्धानि निवड भजने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डेबूसावली संचालक यांनी स्मृती चिन्ह प्रतिष्ठानला देऊन आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे संचालक सौ. ममता दादूरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव नवीन कपूर यांना केले
कार्यक्रमच्या यशस्वी करिता श्री. प्रदीप रणदिवे, सचिन इमले, प्रतीक लाड, सुरेश सातपुते, भूषण कल्लूवार, आशा यादव, रिंकी कपूर, पंकज नागरकर, पवन कामटकर, रुपेश माझेडोळे, मंगेश पंदिलवार, राकेश पंदिलवार, दिलीप लोडल्लीवार , मनीषा वरभे, प्रवीण काळे, कृनाल खणके यांनी अथक परिश्रम घेतले