Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

पुर्वोत्तर राज्यातील युवकांनी कौशल्य विकासासोबत छंद ही जोपासावा:विश्राम जामदार

नागपुर/प्रतिनिधी:

गृह मंत्रालय, भारत सरकार व युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केन्द् संगठन, मुख्यालय, नवी दिल्ली व जिल्हा प्रशासन व्दारा उत्तर पुर्व युवा आदान प्रदान कार्यक्रम नागपुरात 16 फेब्रुवारी, 2019 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान दररोज पुर्वोत्तर राज्यातील जवळपास 275 युवक युवतींसाठी बौध्दिक, संस्था भेटी, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र इत्यादी आयोजित केलेले आहे.

ज सकाळी पहिल्या सत्रात मा.श्री. विश्राम जामदार, अध्यक्ष, विश्वेश्वरया नॅशनल इन्सि‍टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपुर यांनी उपस्थित युवक युवतींना कौशल्य विकास, (Skill Development) या संबंधी प्रबोधन केले. कौशल्य म्हणजे काय हे सांगतांना ते म्हणाले की, “कुठलेही काम सुरळीत, वेळेवर व उत्कृष्ट रित्या पार पाडले जाते. त्याला आपण कौशल्य म्हणतो. हे कौशल्य विकासीत करण्याकरिता भरपुर वाचन, शिक्षण हे अगत्याने महत्वाचे आहे. कौशल्यासोबतच आपल्यात छंद जोपासने गरजेचे आहे. व हा छंद आपण जोपासल्यास आपण जस जसे उतार वयात जातो तेव्हा आपल्याला अनेक काळज्या व समस्या निर्माण होतात व त्यामुळे आपल्यात कधी कधी नैराश्याची भावना येवू शकते. परंतु, आपण कुठलाही चांगला छंद जोपासला तर आपल्यात उर्जा ही सतत निर्माण होत राहते. आपण जेव्हा कुठे जातो व संवाद साधतो तेव्हा आपली शारिरीक हालचाल, हावभाव हे फार महत्वाचे असतात. व यावरूनच समोर असणारी व्यक्ति आपले चारित्रय गृहीत धरत असतो. म्हणुन आपल्या जीवनात आपल्या शारिरीक हालचाल व हावभाव हे अतिशय महत्वाचे आहे”. असे ते सरतेशेवटी म्हणाले.

दुपारच्या सत्रात प्रेरक प्रशिक्षक श्री्. विनय चावला यांनी उपस्थित युवकांना एका कथेचा प्रारंभ करून सुरूवात केली. व या कथेतुन आपल्या प्रबोधनाकरिता वातावरण निर्मिती केली. या कथेनंतर प्रत्येक युवकांने आपल्यात सकारात्मक व़ृत्ती जोपासली पाहिजे. आज रोजगाराची समस्या भिषण असतांना सुध्दा रोजगार किंवा नोकरीची निवड करतांना प्रथम ज्या संस्थेत/कंपनीत आपण नोकरी शोधतो किंवा करू इच्छितो त्यांच्या बदलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी. आपली रोजगारा संबंधी वा नोकरी संबंधी श्री. चावला यांनी इच्छा, आवड व व्यवसाय यामध्ला फरक स्पष्ट केला. कुठलीही गोष्ट करतांना प्रत्येकाने नियोजन करने महत्वाचे असते. त्याकरिता त्यांनी एक उपस्थित युवकां करिता चर्चासत्र सुध्दा आयोजित केले. व चर्चा करत असतांना आपण चर्चेतून वादविवादाकडे कसे वळतो याचे विश्लेषण केले. आज अनेक कंपनी/संस्था नोकरी देतांना चर्चासत्राच्या माध्यमातून निवड करत असते. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असते. तसेच त्यांनी युवकांकडून अपेक्षित असलेल्या प्रश्नांची उत्तरे देखिल दिली. 

आजच्या दिवसाच्या सांयकाळच्या सत्रात श्रीराम बांदे, निवृत्त बँक ऑफ इंडिया अधिकारी यांनी शासनाच्या विविध आर्थिक समावेशक योजना मुख्यत्वे रोजगार संबंधीच्या ऋण योजनांची माहिती दिली. केन्द्र शासनाच्या मुद्रा योजना, स्किल इंडिया, स्टँड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया इ. योजना सविस्तर रित्या समजावून सांगितल्या. आपल्यातील इच्छा शक्ति, प्रामाणिकपणा, श्रम इत्यादींची सांगड घालुन आपण रोजगार निर्मिती व व्यवसाय वृध्दिंगत करू शकतो असेही ते म्हणाले.

 सायंकाळचे सत्र हे युवकांच्या दृष्टिने अतिशय आवडीचे व प्रभावी होते ते म्हणजे, “माध्यमांसोबत संवाद”  या सत्राकरिता जिल्हा माहिती अधिकारी, नागपुर यांचे सहकार्य लाभले. या चर्चासत्रात पुर्वोत्त्र युवकांनी उत्सफुर्तरित्या माध्यमांच्या प्रतिनिधिंसोबत मनमोकळया गप्पा मारल्या. त्यांनी निर्सगाने नटलेल्या सुंदर पुर्वोत्त्र राज्याची संस्कृती, अडचणी, समस्या व जीवनपध्दती याविषयी आपले मत मांडले. पुर्वोत्त्र चा विकास, रस्ते, उच्च्‍ शिक्षणासाठीच्या येणा’या अडचणी याविषयी त्यांनी माघ्यमांकडे लक्ष घाल्याची साद घातली. गेल्या काही वर्षात सरकार पुर्वोत्त्र राज्याच्या विकासाकरिता कटिबध्द असल्याचेही त्यांनी नमुद केले. सरतेशेवटी माध्यमांच्या प्रतिनिधीं पुढे पुर्वोत्त्र राज्यातील चमुंनी त्यांच्या संस्कृती, लोकनृत्य, गित, नाटीका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या चमुने सुध्दा ‘घारिया’ हे आदिवासी नृत्य सादर केले.

   उत्तर पुर्व युवा आदान प्रदान कार्यक्रम नेहरू युवा केन्द्राचे राज्य निदेशक, मा. श्री. दिनेश राय यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात येत आहे.या

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. शरद साळुंके, नेहरू युवा केन्द्र, नागपुर, श्री.हितेंन्द्र वैद्य, सौ.ज्योती मोहिते, श्री. देवेंद्र कुमार, श्री.पवन कुमार, श्री. अखिलेश मिश्रा, अनिल ढेंगे, रमेश अहिरकर, मंगेश डुबे, देवेनद्र इखार, ज्योति जुननकर, व सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक झटत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.