वर्धा/प्रतिनिधी:
वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणने वर्धेत आणखी ४ चोऱ्या पकडल्या असून वीज चोरांकडून १ लाखापेक्षा अधिक देयकाची रक्कम आणि तडजोड शुल्क वसूल करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. या अगोदर महावितरणने मागील आठवड्यात २ वीज चोऱ्या पकडल्याने वर्धेतील वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.

शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी महावितरणच्या वर्धा विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या नेतृत्वाखाली वीज चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी केजाजी नगर, गोंड मोहल्ला, पूल फैल या भागात मीटर तपासणी मोहीम सुरु होती. तपासणी दरम्यान ३ वीज ग्राहकांनी मीटरला बायपास करून थेट वीज वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. यात केजाजी नगर, पुल फैल येथील वीज ग्राहक या प्रकारे वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले. पुल फैल येथील वीज ग्राहकाने ५ हजार १२६ युनिट्सची वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्याला ८ हजार रुपये वीज वापराचे आणि ४ हजार रुपये तडजोड शुल्क असे एकूण १२ हजार रुपयांचे देयक देण्यात आले आहे.
केजाजी नगरातील २ वीज ग्राहकांनी १० हजार ९७ युनिट्सची वीज चोरी केली. दोन्ही वीज ग्राहकांना तडजोड शुल्कासह एकूण ६४ हजार १८० रुपयांचे देयक देण्यात आले. अन्य एका प्रकरण घरगुती वीज ग्राहकाने व्यवसायीक कारणासाठी वापरल्याची बाब मीटर तपासणी दरम्यान निदर्शनास आली. या वीज ग्राहकाला तडजोड शुल्कासह ४० हजार ५५० रुपयांचे देयक देण्यात आले आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांना वर्धा उपविभागीय कार्यालयातील सहायक अभियंता स्मुर्ती किन्नाके, मुख्य तंत्रज्ञ नरेश भारद्वाज यांनी मदत केली.
मागील १० महिन्याच्या कालावधीत वर्धा जिल्ह्यात वीज मीटर फेरफारच्या ४२४ घटना उघडकीस आल्या असून यातील ७ जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोबतच अनधिकृत वीज पुरवठा घेतल्या प्रकरणात ६ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे महावितरणकडून दाखल करण्यात आले आहेत.