पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित केलेल्या सी.सी.टिव्ही
यंत्रणेजवळ इन्व्हर्टर बसविण्याची गरज
पुसेसावळी/( राजु पिसाळ ):
पुसेसावळी ग्रामपंचायतीकडून मुख्य बाजारपेठतील दत्त चाैकात अती उच्च दाबाचे चार सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
परंतु महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळाचा वीज पुरवठा खंडीत झाल्यावर पुसेसावळीतील सी.सी.टि.व्ही यंत्रणा बंद पडत असल्याचे चित्र समोर आले.
चार दिवसापुर्वी पुसेसावळीमधुन एका मुलाचा मोबाईल चोरीस गेला असल्याची तक्रार देण्यासाठी काही मुले पोलीस स्टेशनला आली व त्यांनी आमचा मोबईल दत्त चौकात गेला असल्याचे सांगितले आणि सर तुम्ही सी.सी.टि.व्हीमध्ये चेक करा.त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये असणार्या अधिकार्यानी सी.सी.टिव्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात केली असता लाईट गेलेल्या वेळेतला डाटा ब्लँक असल्याचे आढळुन आले.
त्यामुळे राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशिल असणाऱ्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावामध्ये असणारी मोठी व्यापारी बाजारपेठेत हे बसविलेले सी.सी.टीव्ही कॅमेरे लाईट गेल्यावर बंद असल्याची वस्तुस्थिती चार दिवसापुर्वी घडलेल्या घटनेवरुन लक्षात आले.
त्यामुळे या परिसरातील घडणाऱ्या अनुचित प्रकारावर आळा बसेल, बाजारा दिवशी अनेक महिलांचे दागिने, लोकांचे मोबईल, पाकिटे मारली जायची यावरती अंकुश राहिल, त्यामुळे चोरीच्या घटनानचे प्रमाणात कमी होईल. या उद्देशाने ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन याचे फुटेज दुरक्षेत्र पुसेसावळी येथे कार्यन्वित केले आहेत,
परंतु या घटनेवरून अजुन अपुर्या असणार्या इन्व्हर्टरची पुर्तता करुन ग्रामपंचायतीने सी.सी.टिव्ही बाबत जागृतता दाखवली पाहिजे. तरच पुसेसावळीच्या सुरक्षिततेबाबतचा घेतलेला निर्णय पुर्ण होवु शकेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.