नवनियुक्त सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांची ग्वाही
नागपूर / अरूण कराळे:
लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू मला मिळाले असून ग्रामीण भागात समाजकारणाची चळवळ उभारण्यासाठी माझ्या खांद्यावर शिवसेना पक्षाने जिल्हयात संघटन मजबूत करण्यासाठी हिंगणा विधानसभा क्षेत्रात सहसंपर्क म्हणून नियुक्ती केल्याचे दिवाकर पाटणे यांनी सांगीतले.
लोकसभा निवडणूकीचे नियोजन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार विदर्भाचे संपर्क प्रमुख खा . गजानन किर्तीकर व रामटेकचे खा . कृपाल तुमाने यांच्या सहमतीने नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख सुधार सुर्यवंशी यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रात सहसंपर्क प्रमुख पदावर दिवाकर पाटणे यांची नियुक्ती केली आहे .
दिवाकर पाटणे यांच्या नियुक्ती बद्दल नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र हरणे , उपजिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार , दिलीप माधनकर , हरिशभाई हिरणवार, तालुकाप्रमुख संजय अनासाने , नंदू कन्हेर , विलास भोंबले, उपतालुका प्रमुख रूपेश झाडे , वाडी शहरप्रमुख प्रा . मधु माणके पाटील , वसंतराव इखनकर, अमोल कुरळकर , शब्बीर शेख , प्रकाश सोरदे , अनवर शेख , संजय सेलुकर आदींनी अभिनंदन केले .