Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९

ओबीसी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दिल्ली:जंतर-मंतर येथे आंदोलन 
ओबीसीचे आरक्षण 11 टक्के का? 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

राष्ट्रीय ओबीसी महासंघ विद्यार्थी शाखेतर्फे व युवक शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सोमवारला सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन कुकडे, उपाध्यक्ष डॉ. संजय बरडे, महासचिव प्रा. विजय मालेकर, विमाशिचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, संजय सपाटे, कुणाल चहारे, अँड. भास्कर दिवसे, प्रा. बबन राजुरकर यांचे व शेकडो ओबीसी विद्यार्थी युवकांच्या उपस्थितीत ओबीसीच्या मागण्याकरिता धरणे आंदोलन संपन्न झाले.

ओबीसी समाजाची जातीनिहाय्य जनगणना करून केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, सर्व विद्यापीठातील १३ पाईंट रोस्टर रद्द करून २०० पाईट रोस्टर लागुकरण्याबाबत, ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना केंद्रात १९९८ व राज्यात सन २००२-०३ पासुन १००% शिष्यवृत्ती लागु करण्यात आली होती. शासन निर्णय क्र. इमा. व. २००२/प्र. क्र. ४१४ धमावक - ३ दिनांक २९ मे २००३ च्या परिपत्रकानुसार अनुसुचित जाती जमातीच्या धरतीवर राज्य शासनाने शालांत परिक्षेत्र शिष्यवृत्ती योजना लागू केली होती. सन २००२-०३, २००३-०४, २००४-०५, २००५-०६ या वर्षात १००% शिष्यवृत्ती देण्यात आली.

नंतर राज्य शासनाने ज्यांचे उत्पन्न १,००,०००/- च्या खाली आहे त्यांना निर्वाह भत्ता १००% व प्रशिक्षण शुल्क / परिक्षा शुल्क ५०% देण्यात येत आहे. तरी शासन परिपत्रकानुसार ओबीसी विद्यार्थ्याना १००% शिष्यवृत्ती देण्यात यावी. व्यवसाईक कोर्स मधील एम.बी ए., एम.सी.ए., एम. टेक, बी बी.ए., बी.सी.ए., बी.सी.एस. व नर्सिंग या कोर्सेसना भारत सरकार शिष्यवृत्ती देण्यात येत नाही तरी १००% शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी. तर मागील चार वर्षापासुन थकीत असलेली शिष्यवृत्ती व महाराष्ट्र सरकारची फ्रीशिप विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करण्यात यावी. 
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या उत्पन्नाची मर्यादा एस.सी., एस.टी. च्या प्रमाणे अडीच लाख करण्यात यावी. शासन निर्णय दिनांक १८ जून १९९४ अन्वये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धुळे, ठाणे, नाशीक, नंदुरबार व पालघर या जिल्ह्यातील अनुक्रमे १९%, ६%, १४%, आणि ९% वर्ग -३ व ४ च्या नौकर भरतीत आरक्षण करण्यात आले आहे. सन १९९४ साली जिल्हा संवर्गातील शासकीय पदावरील भरती केवळ सेवायोजन, समाजकल्याण व आदीवासी विकास विभागामार्फत याद्या मागवुन करण्यात येत होती.

 व एका उमेदवारास केवळ स्थानिक जिल्ह्यातच नोंदणी करता येत असल्याने या जिल्ह्यात ओ.बी.सी. समाज मोठ्या प्रमाणावर असुनही त्याच जिल्ह्यातील ओ.बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातुन संधी मिळत असल्याने व आरक्षणाचे आधारे अनु. जातीच्या उमेदवारांना शासकीय सेवेत संधी मिळत होती. परंतु परी परिपत्रक १९ नोव्हेंबर २००३ अन्वये न्यायालयाने सिव्हिल अप्लीकेशन क्र. ११६६४६, १९१७२४/१९९६ अन्वये रिक्‍त पदे रेडीओ, टी.व्ही., वृत्तपत्रातन जाहीरात देवून अर्ज मागविण्यात यावे व त्याचा विचार पदे भरतांना करण्यात यावे.असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातन अर्ज प्राप्त होत असल्याने या जिल्ह्यातील सर्व ओबीसी.प्रवर्गातील पदसंख्या कमी असल्याने या जिल्ह्यातील ओ बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. 

सद्या सर्व जिल्ह्यातील उमेदवार सर्व जिल्ह्यात नियुक्तीसाठी पात्र ठरत असल्याने महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्ह्यातील आरक्षणाचे प्रमाण सारखेच ठेवण्यात यावे. तसेच शासन निर्णय १९ डिसेंबर २०१९८ च्या निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यात एकही टक्का मराठा समाज नसतांना त्यांना १६% जागा आरक्षीत केलेल्या आहे. ब ओबीसी समाजासाठी नाममात्र फक्त ११% जागा आरक्षित आहे. त्या जागा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याप्रमाणे पुर्ववत करण्यात याव्या. ओ बी सी. विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागु करण्यात यावी, महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या ३६ वसतीगृहाचे त्वरीत बजेटमध्ये तरतुद करून लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे. 

सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व योजनेचा लाभ जसे स्पर्धा परिक्षा, युपीएससी प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण, पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हींग प्रशिक्षणदो व यावे ब ओबीसी शेतकऱ्यांना अनुसूचित जाती/ जमातीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात यावा. एस.सी., एस.टी. संवर्गातील मुलामुलींना सर्व स्पर्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात येते ती सुध्दा ओबीसी संवर्गातील मुलामुलींना देण्यात यावी. बिगर आदिवासींना वनपट्टयासाठी असलेली तीन पीढ्याची अट रद्‌द करण्यात यावी. इत्यादी ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, केंद्रिय गृहराज्यमंत्री यांना जिल्हाधीकारी साहेब, चंद्रपूर यांचे मार्फत सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनाला ओबीसी समाजातील शेकडो विद्यार्थी, युवक समाज बांधव उपस्थित होते. 

या धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन कुकडे, महासचिव प्रा.विजय मालेकर, बबनराव फड, बबनराव वानखेडे, प्रा. बबनराव राजुरकर, डॉ. संजय बरडे, सुधिर टिकले, संजय चवरे,सुभाष गोहोकार, बबनराव वानखेडे, मंगेश पाचभाई, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निकीलेश चामरे, जिवन गाडगे, उमंग हिवरे, शुभम पवार, तुप्तेश मासिरकर, रोशन पाचभाई यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.