Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

‘एनपीसीआय’द्वारे ‘डिजीटल’ व्यवहारांच्या सुरक्षा उपक्रमास प्रारंभ

C:\Users\kunal.kalawatia\AppData\Local\Microsoft\Windows\INetCache\Content.Word\NPCI-01.jpg


मुंबई, १८ फेब्रुवारी २०१९ : ग्राहकांना ‘डिजीटल’ रकमेच्या देवाणघेवाणीचा सुलभ, सुकर, सुरक्षित अनुभव देण्यासाठी ‘नॅशनल डिजीटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) ही संस्था आघाडीवर आहे. ‘डिजीटल’ व्यवहारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ग्राहकांनीही आता एखाद्या नवीन ‘इकोसिस्टीम’च्या सुरक्षिततेची माहिती करून घेणे आवश्यक आहे. ‘एनपीसीआय’ने अॅप्लिकेशन्समध्ये विविध सुरक्षा नियंत्रणे वापरून ग्राहकांच्या सुरक्षिततेची प्रक्रिया सुरू केली आहे.
‘रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘डिजीटल पेमेंट इकोसिस्टीम’मध्ये रिमोट स्क्रीन अॅक्सेस अॅप्सद्वारे होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल एक परिपत्रक काढले आहे. ‘एनपीसीआय’ ही संस्था ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असून ‘आरबीआय’ने आपल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार तिचा या गोष्टीला पाठिंबा आहे. ‘एनपीसीआय’ला अलीकडेच अशापद्धतीच्या गैरव्यवहारांची माहिती मिळालेली असून त्यानुसार संबंधित नियंक्षण संस्थांना त्याबद्दल कळविण्यात आले आहे.


कार्यपद्धती (रिमोट स्क्रीन अॅक्सेस)
फसवेगिरी करणाऱ्यांकडून ग्राहकांना त्यांच्या ‘प्ले स्टोअर’मधून ‘AnyDesk’ नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आमीष दाखवले जाते. ग्राहकाच्या मोबाईलवर नऊ आकड्यांचा अॅप कोड निर्मिला जातो. ग्राहकाने हा कोड शेअर करावा असे फसवणूकदाराकडून सांगितले जाते.

एकदा का फसवणूक करणाऱ्याने हा कोड आपल्या मोबाईलवर टाकला की ग्राहकाला त्याच्याकडून काही परवानग्यांबाबत विचारले जाते. इतर अॅप वापरताना ज्या परवानग्यांबद्दल विचारणा केली जाते, त्यासारखीच ही विचारणा असते. त्यानंतर फसवणूक करणाऱ्याला ग्राहकाच्या मोबाईलचा ताबा घेता येतो. त्यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर फसवणूक करणाऱ्याला मोबाईल अॅपद्वारे बॅंकिंग व्यवहार करणे शक्य होते.


ग्राहकाच्या मोबाईवर असणाऱ्या सर्व अॅप्लिकेशन्सना (पेमेंट, बॅंकिंग, वॉलेट्स, सोशल मिडीया) अशाप्रकारचा धोका फसवणूक करणाऱ्यांकडून उद्भवतो. फसवणूक करणाऱ्याने ग्राहकाच्या मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर त्याला बॅंकिंग व्यवहाराखेरीज ग्राहकाच्या मोबाईलवरून ऑनलाईन शॉपिंग करणे तसेच रेल्वे-विमानाची तिकीटेही आरक्षित करता येतात.
अशाप्रकारच्या गैरव्यवहारांची संख्या सध्या कमी असली तरी (पाच गैरव्यवहारांची नोंद) ‘एनपीसीआय’ याबाबत जागरूक असून ग्राहकांनीही त्याबद्दल काळजी घ्यावे असे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


‘एनपीसीआय’च्या रिस्क मॅनेजमेंटचे प्रमुख श्री. भारत पांचाळ म्हणाले, “अशाप्रकारच्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ‘एनपीसीआय’कडून सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी ग्राहक शिक्षणाद्वारे अशा हल्ल्यांना प्रतिबंध घालता येऊ शकतो. मात्र बॅंक आणि फिनटेक कंपन्यांसह सर्व इकोसिस्टीमने ग्राहकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही जागरुकता आपल्या खात्याचे किंवा कार्डाचा तपशील कोणाला सांगू नये, ओटीपी-पिन क्रमांकाबद्दल गुप्तता राखणे यासंदर्भात आहे. ‘युपीआय’ हा प्लॅटफॉर्म संपूर्णत: सुरक्षित असून 2FAशी जोडलेला आहे. ‘एनपीसीआय’द्वारे ‘युपीआय’ प्रणालीचे संरक्षण केले जात असून गैरव्यवहारांवर लक्ष ठेवणे तसेच गरज पडल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचेही काम या संस्थेद्वारे केले जाते.”


याच गोष्टीला प्राधान्य देऊन ‘एनपीसीआय’ने वर्तमानपत्रे आणि रेडिओ या माध्यमांद्वारे ग्राहकांची सुरक्षा आणि जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात ‘एनपीसीआय’ने त्यासंदर्भात ट्विटरवर ‘थांबा. विचार करा. कृती करा’ नावाचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे ग्राहकांकडूनच त्यांना जागृत करण्यासाठीच्या कल्पना मागविण्यात आल्या. हा उपक्रम म्हणजे ‘ग्राहकांकडून ग्राहकांसाठी’ या पद्धतीचा आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.