वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे वाडी नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या २५ वार्डातील समस्या संदर्भात बुधवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ .३० वाजता डॉ .आंबेडकर नगर मधील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून वाडी नगर परिषदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांच्या नेतृत्वात आ .प्रकाश गजभिये , माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या मार्गदर्शनात धडक मोर्चा निघणार आहे . वाडीतील प्रत्येक वार्डात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून वेणा जलाशयात फक्त ६ टक्केच पाणी शिल्लक आहे . त्यामुळे येत्या काही दिवसात नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे . डॉ .आंबेडकर नगरमधील पट्टयाचा विषय प्रलंबीत आहे ,गडर लाइन समस्या , अंतिम संस्कारसाठी स्मशानभूमित निशुल्क जळावू लाकूड ,ट्रान्सपोर्ट क्षेत्रात शौचालय ,वाडीत पोस्ट ऑफीस, महामार्गावरील पथदिवे , स्वतंत्र भाजीबाजार , स्वतंत्र मटन मार्केट , ग्रामीण रुग्णालय , वनराईच्या जागेवर मुख्य बसस्थानक , अग्नीशामक वाहन अशा एकुण १३ मागण्या संदर्भात धडक मोर्चा निघणार आहे . मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्याम मंडपे , गटनेता राजेश जयस्वाल ,सुरेखा रिनके, मोहन ठाकरे, डॉ . सारीका दोरखंडे , रेखा लिचडे , राजेश जिरापूरे , सुनंदा ठाकरे , दिनेश उईके , योगेश चरडे आदींनी केले आहे .
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा वाडी नगर परिषदवर