नागपूर/प्रतिनिधी:
प्रत्येक जिल्ह्यात पाच एकर ते दहा एकरच्या अशा जमिनीवर वृक्षारोपण करून ऑक्सिजन पार्क तयार करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
यासाठी जिल्हानिहाय जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला वार्षिक प्रारूप आराखडा अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत शनिवारी सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत मुनगंटीवार विकास योजनांची घोषणा केली.
जिल्हा नियोजन आराखड्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा तसेच अतिरिक्त मागणी यावेळी केली. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्यासह विभागातील इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वार्षिक योजनेच्या प्रारुपाचे सादरीकरण केले.
वर्ध्याचे मॉडेल इतर राज्यात
ऑक्सिजन पार्क तयार करण्याचा पहिला प्रयोग वर्धा येथे राबविण्यात आला. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर आता इतर जिल्ह्यातही हा प्रयोग राबविण्यता येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.