Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १९, २०१९

शिक्षण आयुक्त यांच्या सन्मानार्थ खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

नागपूर / अरूण कराळे:

नागपूर जिल्हा व शहर खाजगी प्राथमिक शिक्षक संघानी शिक्षण आयुक्त यांच्या सन्मानार्थ शनिवार १९ जानेवारी रोजी नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . पूणेचे शिक्षण आयुक्त यांच्या सोबत विविध संघटना द्वारे दिनांक २० सप्टेंबर २०१७,दिनांक २३आॅगष्ट २०१८ व दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजी बैठका झाल्या परंतु नागपूर शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व शिक्षण उपसंचालक या प्रश्नाबाबत गंभीर नाही.
वारंवार विनंती करूनही शिक्षणउपसंचालक यांनी यातील र्निदेशावर खाजगी प्राथमिक शिक्षक संघासोबत चर्चा केलेली नसल्याचे शिक्षकसंघाचे विभागिय सचिव मोहन सोमकुवर यांनी शिक्षण आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे .
शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारावर आळा बसावा,निर्णय जलद व्हावे यासाठी भारतीय प्रशासन सेवेतुन आयुक्त हे पद भरल्या गेले,आयुक्त पदावर डाॅ.पुरूषोत्तम भापकर वगळता चांगल्या निर्णय घेणार्‍या अधिकार्‍यांच्या नेमनुका झाल्या परंतु शिक्षण विभाग त्यांच्या र्निदेशाची अमलबजावणी करण्यात व भ्रष्टाचारास आळा घालण्यात अपयशी ठरलेला असल्याचे खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने दावा केलेला आहे. समायोजन प्रक्रियेत नागपुर जिल्ह्यात नगरपरिषदेतील शाळेत रिक्त जागा ,शासन निर्णय,आयुक्तांचे दि.२३ आॅगष्ट २०१८ चे बैठकीतील र्निदेश असुनही समायोजन प्रक्रिया राबविलेली नाही.स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षकांच्या रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षक असतांना शिक्षक न देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा संपुष्टात आणण्याची मानसिकता म्हणावी काय ? असा सवाल शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांनी केलेला आहे.पैसे देणारांच्याच फाईल्स काढल्या जातात असेही त्यांनी उदाहरणासह स्षष्ट केलेले आहे.

त्यामुळे धरणे आंदोलन केल्याचे खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांनी सांगीतले . या आंदोलनात खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर , विमाशी संघाचे प्रांतीय कोषाध्यक्ष अविनाश बडे , विमाशी संघाचे शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे , सहकार्यवाह अरूण कराळे , पुरुषोत्तम कामडी, गंगाधर पराते , ज्ञानेश्वर डायगव्हाणे ,रहमतुल्लाह खान,विजय नंदनवार,ज्ञानेश्वर वाघ,मोहन सोमकुवर,संजय बोरगावकर,लोकपाल चापले,सदाराम कुर्वे , संजय कृपाल ,मंगला कुंभारे, चंद्रप्रभा चोपकर,कल्पना काळबांडे,कुमुद बालपांडे,गोपाल मुर्‍हेकर,दारासिंग चव्हाण,विलास खोब्रागडे,प्रेमलाल मलेवार,अरूण नवरे,विजय आगरकर,ज्ञानेश्वर घंगारे,प्रमोद कुंभारे,राजकुमार शेंडे,गंगाधर करडभाजने,पवन नेटे,रोशन टेकाडे,दिवान फेंडर,वसंत हिवसे,पंजाब राठोड मारोती देशमुख आदी सह शेकडो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.