Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २९, २०१९

जुन्नर महाविद्यालय व डॉ. मंडलिक यांना पुरस्कार

जुन्नर/आनंद कांबळे 

जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालय व प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक यांना अनुक्रमे “उत्कृष्ठ महाविद्यालय” (ग्रामीण) व “उत्कृष्ठ प्राचार्य” पुरस्कार देवून रोटरी इंटर नॅशनल पुणे डीस्ट्रीकट,यांनी सम्मानित केले.

रोटरी इंटर नॅशनल समाजातील शैक्षणिक, औद्योगिक,शास्त्र, इंजिनिअरिंग,आर्थिक क्षेत्रातील विशेष कार्य करणा-या संस्था.व व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करत असते.जुन्नर तालुक्यातील आदिवासी,डोंगराळ व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचा बौधिकच नव्हे तर सामाजिक व आर्थिक दर्जा वाढविण्यासाठी गेले पन्नास वर्ष श्री शिव छत्रपती महाविद्यालय कार्यरत आहे.संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व विश्वस्थांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षांचे प्रतिनिधी,प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी महाविविद्यालायाचा विकास करत असून पुणे विद्यापीठ क्षेत्रात एक नामवंत आणि उपक्रमशील महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाचा नाव लौकिक आहे.

महाविद्यालयात अकरावी ते संशोधनापर्यंतचे शिक्षण दिले जात आहे.त्या शिवाय बीबीए,बीसीए,आय.टी.व इलेक्ट्रोनिक्स,अभ्यासक्रम अद्यावत संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून चालविले जातात.परंपरागत शिक्षणाबरोबर महाविद्यालयाने विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी युजीसी प्रस्तुत जी.आय.एस.टॅव्हल.अॅड.टुरिझम,Functional English,Enviornment protection,Womens study Centre,Humanright, Remidial Coaching ,Financial Accounting Etc.सुरु केले आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवत मार्च २०१८ मध्ये १२ वी सायन्स चा निकाल ९७.५ % लागला.आहे विद्यापीठ परीक्षेत कु.श्रेया सर्जीने,कु.प्रियांका शिंदे ( रसायनशास्त्र) कु.पोर्णिमा गवारी (गणित) यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.तर एम.एस्सी.प्राणीशास्त्र विषयाचा निकाल १००% लागला.विद्यार्थांना शिक्षणाची विविध शाखातून ज्ञानाची दारे उघडी केल्याने महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी परदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.त्याचबरोबर विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत देखील आहे.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेंना,कमवा व शिका योजना,महिला अभ्यास केंद्र,विद्यार्थी व विद्यार्थिनी कल्याण मंडळ,वाड्मय मंडळ,प्रभावीपणे विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य करीत आहे.

महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक हे संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची धुरा प्रभावीपणे सांभाळीत आहे.त्यांनी इंग्रजी विषयात पीएचडी.केलेली असून जपान,श्रीलंका,इंडोनेशिया इ.देशात भारतीय संस्कृती कार्टून फिल्मस आणि पर्यावरण व मानवी जीवन या विषयावर व्याख्याने दिली असून ३७ शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेली चार पुस्तके लिहिली आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदातून रिसर्च पेपर सादर केले आहेत.तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना “आदर्श कार्यक्रम अधिकारी” इतर संस्थांकडून उत्कृष्ठ अभ्यास “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विद्यार्थी शाररिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी महाविद्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असू अद्यावत प्रयोगशाळा सहकार महर्षी कै.शिवाजीराव तथा दादासाहेब काळे प्रशासकीय इमारत डौलाने उभ्या आहेत.तसेच इंडोर गेम सभागृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व संस्था पदाधिकारी मार्गदर्शनाखाली अध्यक्षांचे प्रतिनिधी,प्रा.व्ही.बी.कुलकर्णी.प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक मदत करत असतात. या सर्व गोष्ठींचा विचार करून रोटरी इंटरनॅशनल महाविद्यालयास “उत्कृष्ठ महाविद्यालय व प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक यांना “उत्कृष्ठ प्राचार्य”पुरस्कार बहाल केले आहेत त्याबद्दल महाविद्यालय व प्राचार्य यांचे विविध संस्थांकडून मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.