विष्णु तळपाडे/(अकोले-अहमदनगर):
दि. १०-१३जानेवारी अकोले तालुक्यातील समशेरपूर जिल्हा परिषद गटांतर्गत मान्हेरे, समशेरपूर,खिरविरे, पाडोशी,पिंपरकणे,केळीरु म्हणवाडी या सर्व केंद्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा खिरविरे येथे मोठ्या उत्साहानं संपन्न झाला.
या मेळाव्यात जवळजवळ ४०-५०गावांतील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध कलाप्रकारांचे सादरीकरण सादर केले .यावेळी विद्यार्थ्यांनी सुभक रांगोळ्या काढल्या,विविध हस्तकला वस्तुचे प्रदर्शन मांडले वेगवेगळी चित्र रेखाटन प्रदर्शनात माडलेले होते.प्रत्येक शाळेने विविध खाउचे स्टाँल माडले होते.छोटी-छोटी मुले अचुक आर्थिक व्यवहार करताना दिसत होती.पालक वर्गातुन या चिमुकल्या मुलांचे कौतुक होत होते.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनेक महापुरुषांची हुबेहुब वेशभुषा करून प्रेक्षकांचे मन वेधुन घेतले,मुलांच्या विविध कलागुणांना या कार्यक्रमात संधी निर्माण झाली होती.रोजच अध्ययन विसरून मुले आज आनंद लुटताना दिसत होती.
आठवडे बाजाराचा एक वेगळा आनंद मुलांना या मेळाव्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले.लिंबू चमचा,बादलीत चेंडू टाकणे,हत्तीला शेपटी लावणे.यासारखे मनोरंजनात्मक खेळ दुपार सत्रात मुलांनी खेळत धमाल केली;अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात जि.प.शाळातील विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा साजरा झाला .
बाल आनंद मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सौ.सुषमाताई दराडे होत्या.त्यांनी क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून उध्दघाटन केले.यावेळी खिरविरे गावचे सरपंच,ग्रामस्त त्याचबरोबर सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख,मुख्यध्यापक,शिक्षिक-शिक्षिका,विद्यार्थी मोठ्या संख्यानी उपस्थित होते.