लाव्हयातील घटना:आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:
मुलगी व वडील या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना लाव्हा गावात घडली असून आरोपी जन्मदात्या कुकर्मी बापाला वाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीला आजपावेतो तीन पत्नी झाल्या असून तिघीही त्याला सोडून गेल्या आहेत. १४ वर्षीय पिडिता व १२ वर्षाचा मुलगा हे तिसऱ्या पत्नीपासून झालेली अपत्य असून मागील १० वर्षांपासून पत्नी सोडून गेल्यानंतर ५१ वर्षीय नराधम आरोपी बाप व मुले सोबत राहतात.पिडिता आरोपीच्या तिसऱ्या पत्नीची मुलगी असून ती आठव्या वर्गात शिकत असतांना मागील तीन वर्षांपासून जन्मदाता बाप जबरीने शारीरिक संभोग करीत होता .पीडिताने प्रतिकार केल्यास आरोपी मुलीला रात्री-बेरात्री केव्हाही मारहाण करून पीडिताचे शारीरिक शोषण करीत होता.शेजाऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यास मुलगी घरातील कामे करीत नाही म्हणून मारले असे नराधम बाप सांगायचा. परंतु या प्रकाराची कुणकुण परिसरात होती.गावातून कुणीतरी कंट्रोल रूमला या संदर्भात माहिती दिली असता .वाडी पोलिसांनी पीडित मुलगी व नराधम बाप याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता हा प्रकार मुलींनी सांगून तक्रार नोंदविली.पोलीसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे.