Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी १०, २०१९

सूर्यकांत खनके यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

चंद्रपूर/प्रतिनिधी:

प्राचार्य सूर्यकांत खनके यांची विदर्भ तेली समाज महासंघ चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.विदर्भ तेली समाज महासंघाची बैठक दिनांक ६.१.२०१९ ला पार पडली.
त्या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर प्राचार्य सूर्यकांत खाणॆ यांना चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ नियुक्ती करण्यात आली.व त्यांना अध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले. प्राध्यापक सूर्यकांत खनके गेल्या 20 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात समाजाचे विविध कार्यक्रम घेत असून ते जिल्हा तेली युवक मंडळाचे अध्यक्ष देखील आहे. गेल्या २० वर्षांपासून ते जिल्ह्यात विविध ठिकाणी वधू-वर परिचय मेळावा व इतर तेली समाजाचे कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहेत. 

त्यांच्या या नियुक्तीबद्दल न्यायमूर्ती गिरिधरराव गिरडकर, माजी आमदार देवरावजी भांडेकर,डॉक्टर वासुदेवजी गडेगोने, प्रकाश देवतळे, राजेंद्र गोधनें,विजयराव वासुदेवराव बावणे,वायुदेव रागीट,बबनराव फंड,अनिल खनके,सुभाष रघाटाते, जगन्नाथ चन्ने, गणपतराव अमृतकर रामरावजी वैरागडे,भाऊरावजी मंगरूळकर,उषाताई हजारे,रावजी चवरे,डॉ.विश्वास झाडे,अ‍ॅड.विजय मोगरे, शोभाताई पोटदुखे,रवींद्र जुमडे, प्राचार्य नामदेवराव वरभे, मधुकरराव रागीट,मन्साराम सातपुते,अ‍ॅड.रवींद्र खनके,प्रा.नारायणराव येरणे,मनोहरराव उमाटे,महेश बारई,सुरेश खनके,डॉ.प्रमोद बांगडे,विनोद बांगडे,आत्माराम चोपकर,बंडूजी गिरडकर,भरत पोटदुखे शंकर किरणे, शामरावजी रघाताटे,रतन हजारे, रमेश भुते, श्रावण खणके, शेखर भाऊ वाढई, संध्या वाढई.संजय बिजवे, यशवंत हजारे, कैलास राहटे, मनोज झाडे या सर्वांनी नियुक्ती बद्दल प्राचार्य सूर्यकांत खनके यांचे अभिनंदन केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.