नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालूक्यातील भिसी येथील डॉ . रामेश्वर भलमे यांचेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. यामुळे परिसरात खळबळ माजली असून सध्या हे डाॅक्टर फरार असल्याचे समजते आहे.
डाॅ. भलमे यांचे मुलीच्या मैत्रीणीवर वाईट नजर होती. गेल्या दिड दोन वर्षोपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार डॉक्टर भलमे कडून घडला, सदर प्रकरणाची कुठे माहीती अथवा कुणाजवळ या प्रकरणाची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. १० डिसेंबर रोज सोमवारला रात्रौ गून्हा दाखल करण्यात आला .
प्राप्त माहीतीनुसार पिडीत मुलगी डॉ. रामेश्वर भलमे यांच्या मुलीसोबत नागपूरला शिक्षण घेत होती. त्यामूळे कधी-कधी ती भिसीला घरी सूद्धा यायची या संधीचा फायदा घेत डॉ. भलमे यांनी तिच्याशी जवळीक वाढविली, या संधीचा फायदा घेत गेल्या एक दिड वर्षापासून सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. सदर प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तीला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. वाढत्या जाचाला कंटाळून पिडीत मुलीने भिसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानूसार ठाणेदार एम .बी. काळे तपासी अधिकारी यांनी कलम ३७६, ५०६ नूसार गुन्हा दाखल केला आहे . सद्यस्थितीत आरोपी फरार असल्याची माहीती ठाणेदार यांनी दिली .