Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०६, २०१८

पारधी वाघरी बोलीभाषा बोलणाऱ्या समाजाची जनजागृती रैली!

उमरेड/प्रतिनिधी:

 पारधी समाज जनजागृती रैली महाराष्ट्र नागपुर येथुन दि .२०नोव्हेंबर ला पारधी समाज जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगणा या राज्यात निघाली या  दरम्यान पारधी समाजाची वस्तुस्थिती, समाजामध्ये मोठया प्रमाणावर होत असलेले  धर्मांतर असे अनेक प्रश्न  कर्नाटक राज्य सरकार च्या समोर आणले म्हणून कर्नाटक बँगलोर येथिल RPन्यूज रिपोर्टर मा .रवींद्र यांच्या सोबतच मुलाखत  सोबतच मा .कूमूदा सुशील आप्पा एक्जिटिव इलेक्ट्रिक इंजिनिअर जोग फॉल्स कर्नाटक यांनी मा .अनिल पवार स्टेट कोऑर्डिनेटर कम्युनिटी रिपोर्टर यांचे पारधी समाज जनजागृती रैली दरम्यान हार पुष्पगुच्छ  शाल श्रीफळ नी कर्नाटक मिडीया तर्फे  स्वागत करण्यात आले  .

न्यूज रिपोर्टर रविंद्र यांनी  पारधी वाघरी बोलीभाषा बोलणाऱ्या समाजाची जनजागृती रैलीची डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याचे आश्वासन दिले .पारधी समाजाला एकत्रित आणून त्यांचा हक्काचे त्यांना मिळाले पाहिजे , प्रत्येक राज्यात पारधी समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत , या अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी पारधी समाज जनजागृती रैलीचे आयोजन मा .बबन गोरामन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहेत , पारधी समाज जनजागृती रैली सोबतच कर्नाटक येथून  मा .कूमूदा सुशील आप्पा , व तेलंगणा येथून विजय शंकर सोबत ही रैली कर्नाटक , तेलंगणा राज्यात पारधी समाजातील  वस्तुस्थिती सरकार ला उलगडून दाखविली असल्यामुळे कर्नाटक , तेलंगणा मध्ये रैलीला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहेत .

पारधी समाजामध्ये जनजागृती करून त्यांना शासकीय कागदोपत्री  उदा , आधार कार्ड , राशन कार्ड , जातीचा दाखले , मतदान कार्ड , राहत व वाहत असलेल्या अतिक्रमण जागेचे मालकी पट्टे मिळावेत आपला अधिकार मिळाव्यात करीता पारधी समाज जनजागृती रैली महाराष्ट्रातुन पहिल्यांदाच मा .बबन गोरामन , अनिल पवार , कूमूदा सुशील आप्पा , विजय शंकर , अतिश पवार , शिवसाजन राजपूत यांच्या सौजन्याने ही रैली महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगणा येथिल पारधी समाज जनजागृती रैली भ्रमण करून नागपुर येथे सम्पन्न होत आहेत .

या रैलीचे उदिष्टे म्हणजे पारधी समाजामध्ये  जनजागृती करून मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे , पारधी समाजाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवीत , उदा , कर्नाटक येथिल विजापूर , हुबळी या जिल्हयात हजारोंच्या संख्येत पारधी समाज आज ही सेटलमेंट एरियामध्ये आपले वास्तव्य करीत आहेत त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत , त्यांच्या मध्ये एकतेचा संदेश देणारी रैली चे कर्नाटक राज्यात सर्वत्र कौतुक केले जात आहेत .

         अनिल पवार 
पारधी समाजसेवक नागपुर 
   मो .7888259211

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.