मायणी/सतीश डोंगरे:
( आजवर परंपरेने चालत आलेला सिद्धनाथ रथोत्सव सोहळा मायणी सह पंचक्रोशीसाठी एक सणच ठरत होता यात दैनंदिन कामकाजमुळे थकलेली जनता या रिंगवण यात्रेत कलापथक,लोकनाट्य तमाशा,कुस्ती यासह विविध करमणूक कार्यक्रम पाहून सुखावत होती.परंतु गावातील दोन्ही गटांकडून यात्रेला देण्यात आलेला राजकीय रंग यामुळे प्रशासनाने नाकारलेली कार्यक्रम परवानगी यामुळे गावातील नागरिकांसह सभोवतालच्या गावातील लोकांचा हिरमोड झाला असून मायणी गावाची आजवरची वादाची पार्श्वभूमी पाहता बहुतांश भक्तांनी मायणी यात्रेला डावलून म्हसवड सिद्धनाथ यात्रेस जाणे पसंत केले.)
मायणी ता.खटाव जि.सातारा येथील सालाबाद प्रमाणे होणारा सिद्धनाथ रिंगावण यात्रेचा मुख्य दिवस म्हणजेच रथ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.आज सकाळी मानकरी विकास देशमुख यांच्या हस्ते रथपुजन होऊन रथोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी जि प सदस्य सुरेंद्र गुदगे यांचेसह सर्व मानकरी,ट्रस्टी सदस्य व डॉ मा.आ.दिलीप येळगावकर यांनी सह पत्नी रथाचे दर्शन घेतले मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थित होती .
सकाळी रथास प्रारंभ झाल्यानंतर रथ गावातून नवीपेठ ,चांदणी चौक,वडूज रोड येथून मार्गक्रमण करीत रात्री उशिरा मंदिराकडे पोहचला.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी रथोत्सवास भेट देऊन पाहणी केली.गावातील तणावाचे वातावरण पाहता पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष गोसावी ,पीएसआय अनिल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.