Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २१, २०१८

३३ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

खापरखेडा/प्रतिनिधी
 येथील १९८५ मध्ये महाराष्ट्र विध्यालय खापरखेडा येथे वर्ग १० शिकत असलेल्या विधार्थ्यांची शाळा दिवाळी निमित्यानी सर्व आपल्या गावी सुट्ट्या साजऱ्या करण्या करिता येतात. या निमित्यानी शाळा भरली. यामध्ये  ३३ वर्षाच्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या निमित्यानी एकदिवस सन १९८५ च्या वर्ग दह्वीत शिकत  असलेल्या विधार्थी एकत्र आले. वेळी सर्वांनी मोबाईल वर वाटसप वर ग्रुप बनविला. व सर्वाना एकत्र करण्याचे काम सुरु केले व खापरखेडा येथील दयाशवंत लोन येथे कार्यशाळा भरविण्याचे ठरविले व एकदिवसीय शाळा भरली.


यावेळी कोणी पुणे , मुबई, नाशिक, भंडारा, उमरेड, नागपूर खापरखेडा येथे नौकारीवर विविध व्यवसायात सुजू असलेले सर्व माजी विध्यार्थीसर्वांची भेट एकाचा वेळी प्रत्यक्ष झाली भेट झाल्या नतर आपण शिकत असलेल्या वर्ग दहावीतील आठवणी आपल्या आठवणी ताज्या केल्या सर्व एकमेकांना पाहून हसत होते १९८५ मध्ये दुपारची शाळा १२ ते ५ पर्यंत भरायची यावेळी शालेय काळात मिळत असलेले चाकलेट, उकडलेले बोर,चिचा कार्यक्रमात आकर्षण म्हणून ठेवलेल्या होत्या ती चव घेवून कार्यक्रम सुरु केला  महाराष्ट्र विद्यालय येथे सेवानियुत्त शिक्षक शंकरराव ठाकरे सह पत्नी यांचा उपस्थित सर्व माजी विध्यार्थ्यानी स्वागत सत्कार केले उपस्थित सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वा मध्ये ३३ वर्षा नतर शाळेचे १० वि च्या वर्गात मिळात वेगळाच उत्साह निर्माण करीत होता यावेळी १९८५ च्या १० वीच्या वर्गातील ६० माजी विध्यार्थी मंगला दिवटेलवार, विद्या धुर्डे , वनिता गर्गेलवार , नरेंद्र डाखळे , केवल मेढे, अरविंद सरोदे , दिलीप काकडे, ईशवर ठाकरे, संदीप बोडखे,मुकेश गजभिये ,अजय पातरकर रवी नाईक , दिनेश पवार , सुनिल भगत , रवी मांगे, अरुण रडके , मुकुंदा भस्मे, नाना उके, रमेश सहारे, संजय इटनकर, गणेश चिखले, मनोहर बर्डे, संजय काळे, अरुण बोरीकर, शशिकांत तडस,सुनिल तडस , विजय गायकवाड, आदी प्रामुख्यानी उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.