Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २५, २०१८

महानिर्मिती नाट्यस्पर्धेला सोमवारपासून नाशिक येथे सुरुवात

नागपूर/प्रतिनिधी:

एकलहरे येथील महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रातर्फे उद्यापासून (२६ नोव्हेंबर) राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दहा नाटके सादर होणार असून महाकवी कालिदास कलामंदिर येथे ३० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.
26 ते 30 नोव्हेम्बर दरम्यान  राज्यभरातील महानिर्मितीच्या चंद्रपूर,कोराडी,खापरखेडा,पारस,भुसावळ, परळी,मुंबई,उरण,पोफळी आणि नाशिक असे एकूण 10 नाट्यसंघ आपल्या नाट्यकलेचे प्रदर्शन करणार आहेत. 
स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी १० वाजता महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह यांच्या हस्ते होणार आहे. औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे अध्यक्षस्थानी असतील. प्रकल्प संचालक विकास जयदेव, वित्त संचालक संतोष आंबरेकर, सतीश चवरे, कैलास चीरूटकर, नितीन नांदूरकर, संजय मारूडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवारी चौकशी, चिसौकां ही नाटके सादर होणार आहेत 
सायंकाळी 5 वाजता कोराडी विद्युत केंद्रातर्फे "चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी"हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

26 नोव्हेम्बरला नाट्यस्पर्धेचे उद्धघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसनीस यांचे हस्ते होणार आहे तर परीक्षक म्हणून 
 संजय आर्विकर (नागपूर) जुगलकिशोर ओझा (कराड़)
 सुजाता देशमुख (नाशिक) हे कार्यभार सांभाळणार आहेत.

तर २७ नोव्हेंबरला ४७ एके ४७, दी गेम ऑफ डेस्टिनी ही नाचके सादर होतील. २८ नोव्हेंबरला षडरूपी, अश्वथा, २९ नोव्हेंबरला पारध, गेट वेल सून आणि ३० नोव्हेंबरला प्रतिबिंब, शूऽऽ कुठे बोलायचं नाही ही नाटके होणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. ही नाटक सर्वांसाठी मोफत होणार असून अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.