Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २१, २०१८

रुनमळी येथे जवान संदीप पवार यांचा सेवापूर्ती सोहळा


खबरबात/ गणेश न्याहळदे
जैताणे (वार्ताहर) ता. (साक्री)
अवघे वय वर्ष दोन असतांना पितृक्षत्र हरपले तरी देखील त्यांच्या आई ने दोघेही मुलांना शिक्षण देत एकाला देशाचे भविष्य घडवण्यासाठी तर दुसरा जवान संदीप पवारला देश्याच्या रक्षणासाठी या मातृभूमीला समर्पित केले त्या मातेने आपल्या जवान संदीपचा गावच्या वतीने सेवपूर्ती सत्कार पाहून आपण कृतघ्न झाल्याची भावना व्यक्त केली.
देशप्रेम व आपल्या राष्ट्राप्रति राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे काम समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांचे परम कर्तव्य असते.या राष्ट्राचा पोशिंदा म्हणजेच किसान आणि संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेला जवान हे दोन घटक मात्र निस्वार्थापणे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यात धन्यता मानत असतात असे प्रतिपादन नाशिक येथील भारतीय सैन्यदलातील कर्नल बी.एस. पाटील यांनी साक्री तालुक्यातील रुनमळी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित निवृत्त जवान संदीप पवार यांच्या नागरी सत्कार तथा कृतज्ञता सोहळ्यात केले.
 आपल्याच खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्त सन्मान होणे खूपच कमी लोकांच्या नशिबी असते.हा गौरव म्हणजे त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची पावतीच असते.सरक्षणदलात सेवेची संधी मिळणे बहुसंख्य ग्रामीण युवकांचे स्वप्न असते.महाराष्ट्र त्यात अग्रेसर असून सातारा जिल्ह्यासारख्या भागाचा आदर्श घेऊन प्रत्येक गावातून किमान 5 युवकांनी तरी सारक्षणदळात दाखल होऊन मायभूमीची सेवा केली पाहिजे.राष्ट्रीय उभारणीत सर्वात महत्वाचा वाटा असनाऱ्या किसान अर्थात बळीराजाही धरणीला आईची उपमा देऊन निस्वार्थापाने कर्म करत असते म्हणून समजणे त्यांच्याबद्दलही कृतज्ञतेची भावना जोपासली पाहिजे असे कर्नल पाटील यांनी पुढे बोलत असताना नमूद केले.
 या कार्यक्रमात संदीप पवार यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.संपूर्ण गाव तसेच पंचक्रोशीतील मान्यवर रावसाहेब पाटील,जितेंद्र पाटील,एस आर बापू रजाळे,देवा बापू नंदुरबार,यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.
       धनाई पुनाई विधायक मंडळाचे अध्यक्ष बाळूशेठ विसपुते,आदर्श विद्या मंदिर निजामपूर चे प्राचार्य जयंत भामरे,मराठा सेवा संघ धुळे जिल्हा संपूर्ण कार्यकारिणी सदस्य,साक्री पंचायत समिती माजी उपसभापती प्रा.डॉ.रविंद्र ठाकरे,रघुवीर खारकर ,माजी सरपंच खंडू माळचे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विपिन पवार यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.चंद्रशेखर पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीततेसाठी संजीवन पवार, दिलीप पवार,साक्री तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत पवार,नंदकिशोर वेंडाइत,आदींनी परिश्रम घेतले.रुनमळी ग्रामपंचायत चौकात झालेल्या या कार्यक्रमास शेकडो नागरिकांनी वैयक्तिक तसेच सामूहिक कृतज्ञता व्यक्त करत संदीप पवार यांचा सन्मान केला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.