Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर १०, २०१८

आज भारत बंद;घराबाहेर पडलात तर सहन करावा लागेल

Image result for भारत बंद
मुंबई/प्रतिनिधी:
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आणि डाव्यांनी हाक दिलेल्या उद्याच्या ‘भारत बंद’मध्ये राष्ट्रवादी, मनसे, शेकाप आणि समाजवादी पार्टी सहभागी होणार आहे. या बंदमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ‘भारत बंद’ला पाठिंबा देतील,देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे.
‘पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही उद्याच्या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि या बंदमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेत आहोत’, असे राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.  या बंदचा त्रास मात्र गणपतीत घरी जाणाऱ्या लोकांना होणार आहे.कारण ऐन पोळ्याच्या दिवशी अन गणपतीची तयारी सुरु असतांना हा संपूर्ण त्रास सहन करावा लागणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.